Excise Department Seizes Smuggling Liquor | (Photo Credits: ANI/X)

सोलापूर येथील दाणाबंदर परिसरातील एका गोदामावर उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून 80 लाख रुपयांच्या विदेशी दारूच्या 590 बाटल्या जप्त (Excise Department Seizes Smuggling Liquor) केल्या आहेत. एका ट्रान्सपोर्ट कंपनीवर छापा टाकून एक ट्रकही जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. प्रेमजी मुन्शी गाला (67), नरेश रामेश्वर रवानी (54) आणि जिशान जुल्फेकर कुरेशी (31) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींमध्ये ज्येष्ठ नागरिकाचाही समावेश आहे. पुढील तपास सुरू आहे. नववर्षाच्या स्वागातासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या पार्ट्यांचे वाढते प्रमाण पाहून मद्यतस्कर सक्रीय झाले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने या तस्करांचा भांडाफोड केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, दाणाबंदर परिसरातील सोलापूर रस्त्यावरील गोदाम क्रमांक 46 मध्ये विदेशी दारूची तस्करी लपवून ठेवल्याची माहिती फ्लाइंग स्क्वॉड युनिट 2 चे निरीक्षक प्रकाश गौडा यांना मिळाली. या माहितीवरुन त्यांनी आपल्या पथकाला घेऊन छापेमारी केली. या छाप्यात विविध परदेशी ब्रँडच्या 261 स्कॉच बाटल्या जप्त करण्यात आल्या. ज्या दिल्लीतून आणल्या गेल्या होत्या. चारचाकी वाहनासह जप्त केलेल्या वस्तूंची एकूण किंमत 22.44 लाख रुपये आहे.

या प्रकरणात पथकाने मुंबई पोर्ट ट्रस्टच्या आवारात दारूचा साठा करणाऱ्या कंटेनरवरही कारवाई केली. ज्यामध्ये कुरेशी नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली. या कारवाईत अधिकाऱ्यांना एकूण 319 स्कॉचच्या बाटल्या आणि 79.16 लाख रुपये किमतीचा मालवाहू ट्रक सापडला. या तस्करीच्या रॅकेटचा सूत्रधार शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

एक्स पोस्ट

कारवाईबद्दल बोलताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोकण विभाग उपायुक्त प्रसाद सुर्वे यांनी सांगितले की, नाताळ आणि नवीन वर्षात अवैध दारूची वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी आम्ही अनेक पथके तयार केली आहेत. दाणा बंदरमध्ये तैनात केलेल्या पथकांपैकी एका पथकाला हरियाणातून अवैध दारूचा साठा येत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरुन पुढील चौकशीत छापा टाकला आणि आम्ही 17 वेगवेगळ्या ब्रँडच्या 580 बाटल्या जप्त केल्या. वाहतुकीसाठी वापरलेले ट्रकही जप्त करण्यात आले आहेत. गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे.