Liquor Home Delivery in Maharashtra: पुणे, नागपुर सह नॉन कंटेन्मेंट झोन मधील दुकानातून 'या' अटींवर आजपासून घरपोच दारू विक्रीला सुरूवात!
Liquor | Image used for representational purpose | (Photo Credit: Wikimedia Commons)

महाराष्ट्रातील तळीरामांसाठी आजपासून (15 मे) राज्य सरकारने घरपोच दारू विक्री पोहचवण्याची सोय खुली केली आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून (Maharashtra State Excise Department) काही दिवसांपूर्वी मद्य खरेदीसाठी दुकानं उघडण्याची परवानगी देण्यात आली होती मात्र त्यावेळेस तळीरामांनी खरेदीसाठी लांबच लांब रांग लावल्याने तो निर्णय मागे घेत आता नागरिकांसाठी आजपासून घरपोच सेवा दिली जाणार आहे.

दरम्यान 14 मे ऐवजी एक दिवस उशिराने म्हणजे आजपासून या सेवेला सुरूवात झाली आहे. यामध्ये दारू दुकान मालकांना डिलेव्हरी बॉय, त्यांची फिजिकल टेस्ट आणि इतर परवानगी घेण्यासाठी 1 दिवस अधिक देण्यात आला होता. महाराष्ट्र सरकारने ऑनलाईन दारू पोहचवण्याची सोय केली असली तरीही त्यामध्ये काही अटी, नियम आहे. नागपूर: ग्रामीण भागातील दारूची दुकाने उघडल्यानंतर तळीरामांच्या दुकानांसमोर लांबच लांब रांगा.

महाराष्ट्रात आजपासून कुठे आणि कशी मिळणार ऑनलाईन दारू?

  • नॉन कंटेन्मेट झोनमधील दारूच्या दुकानांमधून दारू विक्रीला सुरूवात होईल.
  • दारूच्या दुकानात मालक 10 पेक्षा अधिक डिलेव्हरी बॉय ठेवू शकत नाही. तर एक डिलेव्हरी बॉय 24 पेक्षा अधिक बॉटल्स एका वेळी घेऊन जाऊ शकत नाही.
  • दारू विक्रेते मद्याच्या बॉटल्सवर छापील किंमतीपेक्षा अधिक रूपये आकारू शकत नाही.
  • दरम्यान ऑनलाईन दारू खरेदी हा ग्राहक आणि विक्रेते यांच्यामधील अलिखित करार असेल त्यामुळे या दोघांमध्ये काही मतभेद झाल्यास सरकार त्यामध्ये पडणार नाही.
  • दरम्यान ऑनलाईन किंवा घरपोच सेवा असली तरीही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणं बंधनकारक असेल. कामगारांना हात सॅनिटायझने स्वच्छ करणं गरजेचे आहे.

दरम्यान दारू विक्रेत्यांना फोनवरून, मेसेजिंग अ‍ॅपवरून दारूची ऑर्डर स्वीकरावी लागणार आहे. त्यासाठी ग्राहकांना संबंधित क्रमांक देणं, दुकानाबाहेर लिहण्याची सोय करावी असं काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जारी केलेल्या पत्रकामध्ये सांगण्यात आले होते.