नागपूर (Nagpur) जिल्ह्यात शुक्रवारपासून दारू विक्रीस (Liquor Sales) सुरुवात झाली आहे. नागपूरमधील ग्रामीण भागातील दारूची दुकाने उघडल्यानंतर तळीरामांनी दुकानांसमोर लांबच लांब रांगा लावल्या आहेत. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे (District Collector Ravindra Thakre) यांनी जिल्ह्यातील ग्रामीण आणि नगरपरिषद भागात दारूची दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.
दरम्यान, नगर परिषद, नगरपंचायत भागात टोकन व ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने दारूची विक्री होणार आहे. त्यामुळे तळीरामांना दिलासा मिळाला आहे. परंतु, शहरी भागात फक्त केवळ ऑनलाईन पद्धतीने विक्री होणार आहे. कंटेन्मेंट परिसराच्या 200 मीटरपर्यंत दारू विक्री होणार नाही. केवळ परवानाधारक व्यक्तीलाच दारू मिळणार आहे. (हेही वाचा - Liquor Home Delivery in Maharashtra: पुणे, नागपुर सह नॉन कंटेन्मेंट झोन मधील दुकानातून 'या' अटींवर आजपासून घरपोच दारू विक्रीला सुरूवात!)
Maharashtra: Long queues seen outside liquor shops in Nagpur rural after such shops opened here today. District collector Ravindra Thakre has permitted liquor shops to open in rural and municipal council areas of the district. #CoronaLockdown pic.twitter.com/28H7ZaadV9
— ANI (@ANI) May 15, 2020
लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्र व राज्य सरकारने दारू विक्रीस परवानगी दिली आहे. उत्पादन शुल्क विभागाकडून दारू विक्रीसाठी काही अटी व शर्ती घालून देण्यात आल्या आहेत. नागपूर जिल्ह्यात मद्य विक्रीची दुकाने सुरू करण्यासंदर्भात बुधवारी रात्री उशिरा जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बैठक घेतली होती. या बैठकीत आजपासून जिल्ह्यातील दारूच्या दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली. परंतु, पहिल्याचं दिवशी दारूची दुकाने सुरू झाल्याने नागरिकांनी दुकांनाबाहेर लांबच लांब रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळाले.