
Maharashtra Weather: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या झळा आणि उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. राज्यात येत्या काही दिवसात उन्हाचा चटका (Maharashtra Weather) कायम राहणार असल्याचं सांगण्यात आलंय. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, इशान्य भारतात पावसाला पोषक वातावरण तयार झाले असून बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचाच परिणाम दक्षिण मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील तुरळक भागात जाणवणार असून हलक्या पावसाची (Rain) शक्यता या दोन भागांना देण्यात आली आहे.
23 आणि 24 फेब्रुवारीला दक्षिण मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तुरळक भागात हलक्या पावसाच्या सरी हजेरी लावतील असं प्रादेशिक हवामान केंद्राने सांगितलंय. उर्वरित ठिकाणी हवामान कोरडे व शुष्क राहणार असून येत्या 2 दिवसात हळूहळू तापमानवाढ होणार असल्याचं सांगण्यात आलंय.
हवामान विभगााचा अंदाज काय?
राज्यात उन्हाचा तडाखा वाढत आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस राज्यात तापमानाचा पारा वाढलेला राहिल. विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कमाल तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही. मात्र, उत्तर महाराष्ट्रात पुढील दोन दिवस किमान तापमान 1 ते 2 अंशांनी घटेल आणि त्यानंतर ते हळूहळू 2 ते 3 अंशांनी वाढेल. विदर्भात कमाल आणि किमान तापमानात फारसा बदल होणार नाही.