Photo Credit- X

Leopard Attack in Shirur: राज्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या (Leopard Attack) घटनांमध्ये वाढ होत आहे. शिरूर (Shirur) तालुक्यातील जांबुत गावात एका 55 वर्षीय महिलेला बिबट्याचा हल्ल्यात जीव गमवावा लागला आहे. कान्हूर मेसाई गावातील ढगे वस्ती परिसरात दुसऱ्या बिबट्याच्या हल्ल्यात एक शेतकरी जखमी झाला. सतर्कता म्हणून वनविभागाने परिसरात पिंजरे लावून फिरणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. (Leopard Attack: बिबट्याच्या हल्ल्यात शाळकरी मुलाचा मृत्यू; शिरूरमधील घटना)

बिबट्याच्या हल्ल्यात मुक्ताबाई भाऊ खाडे वय 55 यांचा मृत्यू झाल्याची पहिली घटना जांबुत गावात घडली. रविवारी सायंकाळी मुक्ताबाई बेपत्ता झाल्या होत्या. त्यांच्या बेपत्ता होण्याने कुटुंबीय चिंतेत अडकले होते. गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेतला पण त्या सापडल्या नाहीच. त्यामुळे कुटुंबाने त्यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार वनविभागाकडे केली. बरीच शोधाशोध केल्यानंतर दुपारी चारच्या सुमारास मुक्ताबाईंचा मृतदेह जवळच्या उसाच्या शेतात आढळून आला.(Junnar Leopard Attack: जुन्नरमध्ये अंगणात खेळणाऱ्या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू)

बिबट्याच्या हल्ल्याची दुसरी घटना सोमवारी पहाटे कान्हूर मेसाई गावात घडली. ज्यात 60 वर्षीय शेतकरी अंकुश खर्डेवर बिबट्याने हल्ला केला. खर्डे हे नेहमीच्या मॉर्निंग वॉकला जात असताना सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर हल्ला झाला. पिण्याच्या पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी ते विहिरीजवळ आले असता शिकारीच्या शोधात असलेला बिबट्या त्यांच्यावर धावून गेला. बिट्याच्या हलल्यात खर्डे यांच्या चेहऱ्याला व हाताला दुखापत झाली. मात्र आरडाओरडा करताच बिबट्या पळून गेला. त्यांच्यावर सध्या शिरूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.