Nandurbar News: बिबट्यांचा मानवी वस्तींमध्ये वाढलेला वावर आता काही नवीन राहिला नाही. यापूर्वीही बिबट्याने हल्ला करुन अनेक नागरिकांना ठार केले आहे. अशीच एक घटना नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे घडली आहे. अक्कलकुवा शहरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्यापुनर्वसन शिवारात बिबट्याने एका लहान मुलांवर हल्ला (Leopard Attacked) केला. या हल्ल्यात या मुलाचा मृत्यू झाला. सुरेश भाईदास वसावे असे या मुलाचे नाव असून तो केवळ नऊ वर्षांचा होता. ही घटना मंगळवारी (4 एप्रिल) सायंकाळी सातच्या सुमारास घडली.
घटनेबाबत माहिती अशी की, सुरेश वसावे हा नऊ वर्षी मुलगा घराच्या अंगणात जेवण करत होता. त्याचे घर शिवारात आहे. रानातली वस्ती असल्यामुळे आजूबाजूला लोकांचा वर्दळ तसा कमी आहे. त्याचा फायदा घेऊन बिबट्या घराच्या अंगणात आला. बिबट्याने मुलावर हल्ला करत त्याला पकडले आणि फरफटत मक्याच्या फडात नेले. बिबट्याने सुरेश याला रानात नेऊन त्याच्या शरीराचे लचके तोडले. बिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यासमोर या मुलाला स्वत:चा बचावही करता आला नाही.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ४ एप्रिलला संध्याकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान पुनर्वसन शिवारातील शेता समोरील आपल्या घराच्या अंगणात सुरेश भाईदास वसावे हा नऊ वर्षीय मुलगा जेवण करत होता. त्यावेळी अचानक बिबट्याने सुरेशवर हल्ला केला आणि त्याला जवळच्या अमेरिकन मक्याच्या शेतात नेऊन गंभीरित्या जखमी केले. त्यामुळे सुरेशचा जागेवरच मृत्यू झाला. सदर बालकाच्या पृष्ठभागावर तसेच मानेवर बिबट्याने लचके तोडले. यामध्ये या मुलचा जागीच मृत्यू झाला. (हेही वाचा, Leopard Attack News: बिबट्याने घराच्या अंगणातून मुलाला उचलले, शेतात नेऊन खाल्ले; चंद्रपूर येथील घटना)
नागरिकांनी उशीरपर्यंत शोधाशोध केल्यानंतर या मुलाचे बिबट्याने अर्धवट खाल्लेल्या शरीराचा मृतदे रानात आढळून आला. बिबट्याने रिक्त पिल्याने आणि शरीराचा बहुतांश मांसल भाग खाल्याने मुलाचे शरीर कोरडे पडले होते. दरम्यान, घटनेची माहिती कळताच उद्धव ठाकरे गटाचे विधानपरिषदेचे आमदार आमश्या पाडवी, वन विभागाचे वनक्षेत्रपाल एल डी गवळी, पोलीस उपनिरीक्षक रितेश राऊत घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आणि वन विभागाने घटनास्थळावरुन जागेवर पंचनामा केला. त्यानंतर या मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयाला पाठवला.