BEST मध्ये लवकरच Laxmi Jadhav या महिला चालकाच्या हाती येणार बसचं सारथ्य
BEST Bus (Photo Credits: PTI)

मुंबई मध्ये बेस्ट (BEST) बसचं सारथ्य लवकरच महिलांच्या हाती येणार आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मुलुंडच्या रहिवासी लक्ष्मी जाधव (41) या पहिल्या महिला चालक म्हणून पास होणार आहेत. बेस्ट बस मुंबई मध्ये 1926 पासून सेवेत आहे. मागील 96 वर्षांत पहिल्यांदा ही बस चालवण्याची संधी महिलांच्या देखील हातात येणार आहे. जाधव यांना मुंबईत बेस्ट्च्या 400 गाड्या चालवणार्‍या Mateshwari Urban Transport Solutions Pvt Ltd कडून नोकरी देण्यात आली आहे.

बेस्टचे जनरल मॅनेजर लोकेश चंद्रा यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये हा ऐतिहासिक क्षण असेल असं म्हटलं आहे. सुरूवातीला 3 महिला चालक निवडण्यात आल्या आहे. त्यापैकी पहिल्या लक्ष्मी जाधव आहेत. सध्या बेस्ट मध्ये 90 महिला वाहक उत्तम काम करत आहेत. महिला चालकांना ऑन आणि ऑफ रोड ट्रेनिंग दिले जात आहे. त्यांच्या पूर्ण प्रशिक्षणानंतरच त्यांच्याकडे बसचं स्टेअरिंग दिलं जाणार आहे.

लक्ष्मी जाधव या पहिल्या महिला चालक होत्या ज्यांना वडाळा आरटीओ मध्ये 2016 ला रिक्षा चालवण्यासाठी परमीट देण्यात आलं होतं. लक्ष्मी जाधव यांना लहानपणापासून गाडी चालवण्याचं आकर्षण होतं. ट्रॅव्हल एजंसी सोबत काम करताना BMW आणि Mercedes देखील शिकल्या आहेत. पुणे: MSRTC बसचालक पदी पहिल्यांदा आदिवासी महिलांची वर्णी, प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन.

जाधव यांना बेस्ट मध्ये कुणीच महिला चालक नसल्याची माहिती होती. मग त्यांनी दिंडोशी डेपो मध्ये बस चालकाच्या कोर्स साठी अ‍ॅडमिशन घेतलं. 2019 मध्ये त्यांना लायसंस मिळाले.