Unseasonal Rain | Twitter

Latur Unseasonal Rain:  राज्यात अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) कहर हा सुरुच असून या अवकाळी पावसाचा मोठा फटका हा लातूर (Latur) जिल्हाला बसला आहे. जिल्हात रात्री पासून सुरु असलेल्या तुफान पावसामुळे सखल भागात पाणी साचायल सुरुवात झाली असून यामुळे शेतकऱ्यांच्या (Farmers) पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सातत्याने सुरु असलेल्या पावसामुळे शेतमालाचे प्रंचड प्रमाणात नुकसान झाले असून या बरोबरच जोरदार वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा देखील खंडीत झाला होता. मागिल महिनाभर सुरु असलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

लातूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी जनावरांचं मृत्यू झालं आहे. तर वीज कोसळून एका 11 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना देखील समोर आली आहे. आरुषा नथुराम राठोड (वय 11 वर्ष, रा. मुबारकपूर तांडा, ता. निलंगा) असे मृत मुलीचे नाव आहे. आरुषा नथुराम राठोड ही मुलगी शेतात शेळ्या चरण्यासाठी घेऊन गेलेली होती. मात्र, अचानक तिच्या अंगावर वीज कोसळल्यानं तिचा मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच निलंगा तहसील कार्यालयातील महसूल कर्मचाऱ्यांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. लातूर जिल्हात अनेक ठिकाणी जनावरांचे देखील मृत्यू झाला आहे.

या वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाचा फटका निलंगा तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या फळबागेला फटका आहे. तसेच या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने केसर आंबा, द्राक्ष आदी फळबागांचे नुकसान झाले असून प्रशासनाने नुकसान झालेल्या बागांचे तात्काळ पंचनामे करावेत आणि नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी आता करत आहे.