Lokmanya Tilak Terminus: कडक लॉकडाऊनच्या भीतीतून मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसवर प्रवाशांची मोठी गर्दी
Railway Station (Representational Image/ Photo Credit: PTI)

महाराष्ट्रात अटोक्यात आलेल्या कोरोना महामारीने पुन्हा एकदा गंभीर रुप धारण केले आहे. याचपार्श्वभमीवर खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने राज्यात वीकेन्ड लॉकडाऊनसह अनेक निर्बंध कडक केले आहेत. तसेच राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागण्याची दाट शक्यता आहे. याच भितीतून आपपल्या गावी परत जाण्यासाठी अनेक प्रवाशांनी मुंबईतील (Mumbai) लोकमान्य टिळक टर्मिनसवर (Lokmanya Tilak Terminus) मोठी गर्दी केल्याचे समजत आहे. श्रमिक ट्रेन सुटणार असल्याची अफवा पसरल्यानेच ही गर्दी जमल्याची माहिती समोर आली आहे. या गर्दीमुळे लॉकडाऊनमध्ये प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली आहे.

सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवांतून गेल्या वर्षीही लोकमान्य टिळक टर्मिनसवर अशीच गर्दी जमली होती. तसेच आजही आततायीपणा किंवा अफवा पसरल्यामुळेच मोठ्या प्रमाणात प्रवाशी लोकमान्य ठिळक टर्मिनस रेल्वे स्थानकावर गर्दी करत आहेत. दरम्यान, लोकल सेवा किंवा देशभरात होणारी रेल्वे वाहतूक याबाबत अद्याप राज्य सरकारने कोणताही अधिकृत निर्णय घेतलेला नाही. महत्वाचे म्हणजे, नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. हे देखील वाचा-पुणे: रेमडेसिव्हर इंजेक्शन मिळत नसल्याने कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांचा केमिस्टच्या बाहेर घेराव

ट्वीट-

 

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी बारामतीत तातडीची बैठक घेतली होती. या बैठकीनंतरपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लॉकडाऊनबाबत महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. "आज मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेतला जाईल. प्रत्येक ठिकाणी वेगळा निर्णय घेवून चालणार नाही," अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. यामुळे राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन लागणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे.