Remdesivir Vaccine (Photo Credit: ANI)

Pune: पुणे येथे कोरोनाच्या रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत चालल्याने तेथे रुग्णालयात बेड्स सुद्धा उपलब्ध होत नाही आहेत. हिच परिस्थिती असताना कोरोनाच्या रुग्णांवर उपचाराठी वापरले जाणारे रेमिडेसिव्हर इंजेक्शनचा सुद्धा तुटवडा पडल्याची बाब आता समोर आली आहे. त्यामुळे शनिवारी कोरोनाच्या रुग्णांनी केमिस्टच्या बाहेरच घेराव घातल्याचे दिसून आले आहे. तर केमिस्टकडून रेमिडेसिव्हर इंजेक्शन घेण्यासाठी टोकन सुद्धा दिले होते तरीही त्यांना ते मिळाले नाही. गेल्या चार दिवसांपासून पुण्यात रेमिडेसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा पडण्यासह रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.('महाराष्ट्राला आठवड्याभरात लसींचा पुरवठा वाढवला नाही तर SII कडून होणारी लस वाहतूक थांबवू'; राजू शेट्टी यांचा पत्राद्वारे केंद्राला इशारा)

FDA अधिकाऱ्यांनी यांनी इंडियन एक्सप्रेस यांना असे सांगितले की, इंजेक्शनचा पुरवठा पुरेसा होता पण शनिवारी अचानक केमिस्टचा बाहेर नागरिकांची गर्दी दिसून आली. तर सिंहगड येथील एका रुग्णालयातील रुग्णाला रेमिडेसिव्हर इंजेक्शन हवे होते. त्यासाठी त्याच्या नातेवाईकाला शुक्रवारी टोकन दिले होते आणि शनिवारी इंजेक्शन मिळेल असे सांगितले. मात्र केमिस्टमध्ये इंजेक्शनच नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

केमिस्ट असोसिएशनकडून असे सांगण्यात आले आहे की, त्यांच्याकडे आजपर्यंत एकही इंजेक्शन नाही आहे. मात्र नागरिकांनी कुठेही जाण्याची गरज नाही आहे. कारण शहरात 20 डिस्ट्रिब्युशन सेंटर असून फुड अॅन्ड ड्रग्ज अॅडमिनिस्ट्रेशन आणि केमिस्ट असोसिएशन यासंदर्भात एकत्रित काम करत आहेत. तक पुण्यात कालपर्यंत 800 इंजेक्शनची विक्री झाल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र आज सकाळपर्यंत त्याचा साठाच संपल्याने एफडीएकच्या कार्यालयात त्या संदर्भातील माहितीसाठी जाणार असल्याचे असोसिएशन कडून सांगण्यात आले आहे.(Maharashtra Covid-19 Vaccination: महाराष्ट्रात 97 लाखांहून अधिक नागरिकांना दिली कोरोना विषाणू लस; देशात सर्वाधिक लसीकरण करून महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर)

कोरोनाच्या रुग्णांवर सध्या मोठ्या प्रमाणात रेमिडेसिव्हर इंजेक्शनचा वापर केला जात आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून या इंजेक्शनची मागणी वाढत चालली आहे. तर पुणे असोसिएशनच्या मते, इंजेक्शनची मागणी पाचपटीने वाढली आहे.  याआधी 2-3 हजार इंजेक्शनची मागणी होती मात्र आता ती 20 हजारांवर पोहचली आहे.