लालबागचा राजा सार्वजनिक गणपती मंडळाकडून (Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal) महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे. या मंडळाकडून 25 लाख रूपयांची मदत आणि पूरग्रस्त गावाचे पुनर्वसन करण्याचा निर्णय या मंडळाकडून जाहीर करण्यात आला आहे. लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) मंडळाकडून ही मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधी (CM Relief Fund, Maharashtra) मध्ये गोळा केली जाणार आहे. Maharashtra Flood 2019: कोल्हापूर, सांगली भागातील पूरग्रस्तांना तुम्ही कशी मदत करू शकाल?
कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे सह कोकणात विक्रमी पावसामुळे महापूराची स्थिती निर्माण झाली होती. आता या भागामध्ये पावसाचं पाणी ओसरायला सुरूवात झाल्यानंतर मदतीचा ओघ वाढला आहे. पूराचं पाणी ओसरायला लागल्यानंतर आता पूरामुळे झालेल्य नुकसानाची तीव्रता समोर येण्यास सुरूवात झाली आहे. पूरामुळे शेती, घरं आणि अनेक प्राण्यांचं नुकसान झालं आहे.
महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार लालाबागचा राजा सार्वजनिक गणपती मंडळ यंदा महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी पुढे आले आहेत. यापूर्वी चिंचपोकळीचा चिंतामणी गणपती सार्वजनिक मंडळानेदेखील 5 लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच मुंबईत पार पडलेल्या आगमन सोहळ्यामध्ये भाविकांनाही दान करण्याचं आवाहन केलं आहे. असदुद्दीन ओवैसी कडून महाराष्ट्र आणि केरळ राज्यातील पूरग्रस्तांना प्रत्येकी 10 लाखाची मदत
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी सामान्यांसह सेलिब्रिटी आणि राजकारण्यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कॅबिनेट मंत्र्यांनी आपला पगार दान केला आहे. तसेच अभिनेते नाना पाटेकरांनीही गाव दत्तक घेऊन पुर्नविकसाची तयारी दाखवली आहे.