Lalbaugcha Raja 2022 First Look

राज्यात नुकताच मोठ्या धुमधडाक्यात गणेशोत्सव (Ganeshotsav) पार पडला. यावेळी केंद्रस्थानी होता तो मुंबई (Mumbai) आणि पुण्याचा (Pune) गणेशोत्सव. राज्यभरात कोरोनाच्या (Corona) पार्श्वभुमिवर गेले दोन वर्षात गणेशोत्सव साजरा करण्यात आला नाही. त्यामुळे यावर्षी गणेशभक्तांकडून दणक्यात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. दरम्यान दहा दिवस मुंबईसह (Mumbai) पुण्यात गणेशभक्तांची मोठी गर्दी बघायला मिळाली. लालबागच्या राजाचे (Lalbaug Cha Raja) दर्शन घेण्यासाठी तर भाविक तासानतास रांगेत उभी होती. राजाला भक्तांकडून कोटींचं दान आलं. त्याच दानाचं काल लिलाव (Lalbaug Cha Raja Auction) पार पडला. दरम्यान लालबागच्या राजाच्या वस्तूंचा लिलाव एकूण एक कोटी तीस लाख रुपयांना झाला.

 

लालबागच्या राजाला (Lalbaug Cha Raja) यावर्षी पाच कोटी रोखरक्कम, सोने (Gold) चांदीचे (Silver) दागिने आणि एक हिरो होंडाची बाईक (Hero Honda Bike) गणेश भक्तांकडून दान करण्यात आली. त्यापैकी सोन्या चांदीच्या वस्तूंचा लिलाव (Auction) काल सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत पार पडला. या लिलावात एकूण 200 नागरिकांनी सहभाग घेतला होता. दरम्यान सव्वा किलो सोन्याचा मोदक (Modak), साडे सतरा तोळ्याचा हार, फूल (Flower), मूर्ती ((Lalbaug Cha Raja) Idol), गदा (Gada), चैन अशा सोन्या-चांदीच्या वस्तूंचा समावेश होता. (हे ही वाचा:- Mumbai High Tide Today: मुंबईच्या दर्याला आज उधाण; जाणून घ्या हवामान विभागाच्या विशेष सुचना)

 

गणेशोत्सवानंतर (Ganeshotsav) मंडळाकडून दान केलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तूंचा लिलाव करण्यात येतो. सोने (Gold), चांदी (Silver), रोख रक्कम याशिवाय दानपेटीत चिठ्ठ्या टाकून भाविकांनी लालबागच्या राजाला आपल्या मनातल्या भावनाही कळवल्या जातात. या लिलावात आकर्षक ठरल्या ते सोन्याची लालबागचा राजाची मूर्ती, ज्यावर हिरा लावलेला होता. याशिवाय एक किलो वजनाचं सोन्याचं चॉकलेट, एका सोन्याच्या बिस्किटाचाही लिलाव करण्यात आला.