Sharad Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (Nationalist Congress Party) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी लखीमपूर खेरी हिंसाचार (Lakhimpur Kheri Violence) प्रकरणावरुन पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि केंद्रीय यंत्रणांवर हल्लाबोल केला आहे. लखीमपूर खेरी प्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायाल पाहिजे असे शरद पवार यांनी म्हटले आहे. तसेच, केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरुन सत्तेचा दुरुपयोग करत केंद्रातील सत्ताधारी पक्ष विरोधकांना अडचणी आणत आहेत. महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या अनिल देशमुख यांच्या घरावर यंत्रणांनी पाचव्यांदा छापा मारला. पाचव्यांदा छापा मारण्याचे कारण काय होते? याचाच अर्थ असा की घटनात्मक संस्थांचा दुरुपयोग करण्यात येत आहे. मग ती संस्था सीबीआय, ईडी असो आथवा IT किंवा NCB. शरद पवार हे मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

अनिल देशमुख यांच्या घरावर पाचव्यांदा टाकलेल्या छाप्याचे मला खरोखरच आश्चर्य वाटत आहे. त्यांच्या घरावर पाच वेळा छापा का टाकण्यात आला? जनतेलाही याबाबत माहिती मिळायला हवी, असे पवार म्हणाले. शरद पवार यांनी पुढे म्हटले की, पाठिमागील काही दिवसांपासून आमची (सरकारची) चीनसोबत चर्चा सुरु आहे. ही चर्चा 13 व्या वेळीही अयशस्वी झाली. दुसऱ्या बाजूला कश्मीरमध्ये 5 जवान शहीद झाले. हे अतिशय गंभीर आहे. त्यांनी म्हटले की, मला वाटते सर्व पक्षांनी सोबत येऊन एक भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर कोणतेही राजकारण होता कामानये. सर्वांनी सोबत येऊन आणि सर्वांना सोबत घेऊन काम करणे आवश्यक आहे. दिल्लीला गेल्यानंतर लवकरच विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत आम्ही चर्चा करु. (हेही वाचा, Devendra Fadnavis On Maharashtra Bandh: महाराष्ट्र बंदवर राज्य सरकारचा ढोंगीपणा उघड झाल्याचे म्हणत देवेंद्र फडणवीस यांची टीका)

लखीमपूर खीरी हिंसाचारावर बोलताना शरद पवार यांनी म्हटले की, शेतकऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, केंद्रीय मंत्री पुत्राने शेतकऱ्यांना चिरडले पण सरकार त्यांचे ऐकायला तयार नाही. पाच सहा दिवसांनंतर सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेल्यानंतर पोलिसांनी मंत्रीपुत्रास ताब्यात घेतले. मला वाटते की, याची जबाबदारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांची आहे. ते जबाबदारीपासून पळ काढू शकत नाही. पवार यांनी केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांना तातडीने राजीनामा द्यायला हवा.

आपण चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलो. परंतू तरीसुद्धा आपल्याला आपण मुख्यमंत्री नसताना मुख्यमंत्री असल्याचे लक्षात आले नाही. देवेंद्र फडणवीस यांचे विधान ऐकल्यावर मला हे लक्षात कसे आले नाही असे वाटले, असा टोलाही शरद पवार यांनी या वेळी लगावला.

ट्विट

महाराष्ट्रात मावळ प्रकरणात कोणत्याही प्रकारे राजकीय व्यक्तीचा संबंध नव्हता. शरद पवार यांनी आरोप केला की मावळ प्रकरणावरुन काही लोक आणि पक्ष राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत.