Lady Don Pinky Verma: ‘लेडी डॉन’ पिंकी वर्मा हिची नागपूर येथे हत्या
Murder | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

नागपूर (Nagpur) शहरातील गुन्हेगारी ( Nagpur Crime) आता नवी राहिली नाही. पाठिमागील प्रदीर्घ काळापासून नागपूरात टोळीयुद्ध आणि गुंडगीरी जोरात आहे. टोळीयुद्धातून होणाऱ्या गुंडांच्या हत्याही आता नव्या राहिल्या नाहीत. नागपूरमध्ये आता पुरुष गुन्हेगारांप्रमाणे महिला गुंडही (Lady Don) कार्यरत झाल्याचे धक्कादायक वास्तव पुढे येत आहे. नागपूरमधील एका भागात दबंगगिरी करणाऱ्या एका पिकी वर्मा (Pinky Verma) नावाच्या महिलेची सोमवारी (19 एप्रिल) सायंकाळी हत्या झाली. पिंकी वर्मा ही नागपूरमधील लेडी डॉन (Lady Don) म्हणून ओळखली जात होती. ‘लेडी डॉन’ पिंकी वर्मा (Lady Don Pinky Verma) हिची काही गुंडांनी चाकूने सपासप वार करत नागपूरमध्ये भरदिवसा हत्या केली.

पिंकी वर्मा आणि इतर काही गुंड यांच्यात अवैध धंद्यावरुन काही वाद होता. या वादातून दोघा आरोपींनी तिच्यावर हल्ला केला. यातून तिची हत्या करण्यात आली अशी प्राथमिक माहिती आहे. पिंकी शर्मा ही अवैध धंदे करणाऱ्या व्यक्तींना धमक्या देत असे यातूनच तिचा काही आरोपींशी सोमवारी (19 एप्रिल) वाद झाला. या वादाचे पर्यावसन मोठ्या भांडणात झाले. त्यातून तिची हत्या झाल्याचे सांगितले जात आहे. (हेही वाचा, नागपूर: कोरोनाबाधित पत्नीच्या मृत्यूनंतर संतप्त पतीकडून रुग्णालयाबाहेर तोडफोड)

नागपूर शहरातील पाचपावली भागात सोमवारी सायंकाळी पिंकी वर्मा हिच्यावर दोन आरोपींनी चाकूहल्ला केला. हल्ला होत असताना पिंकी वर्मा बचावासाठी सैरावैरा पळत होती. तिने अनेकांच्या घरासमोर सैरावैरा धावत होती. मदतीसाठी याचना करत होती. परंतू, नागपूरच्या गुन्हेगारीबाबत माहिती असल्याने तिच्या मदतीला कोणीच पुढे आली नाही. अखेर आरोपींनी तिला गाठले आणि चाकूने सपासप वार केले.

दरम्यान, पिकी वर्मा हिला रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतू त्या आधीच तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा गु्नहा दाखल केला आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.