
लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) राबविण्याच्या नादात राज्य सरकार इतर योजनांकडे दुर्लक्ष करत आहे का? असा सवाल निर्माण झाला आहे. कारण या योजनेस निधी पुरविण्याच्या नाधात इतर विभागांद्वारे राबवल्या जाणाऱ्या योजनांचे निधी रखडले किंवा स्थगित केले जात असल्याचे वृत्त आहे. खास करुन या योजनेचा जेष्ठ नागरिक योजना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना (Krantijyoti Savitribai Phule Bal Sangopan Yojana) आणि वन विभागाच्या इतर काही योजनाच्या निधीला कात्री लावण्यात आल्याचे बोलले जात आहे. परिणामी इतर विभागांतील योजनांचे लाभार्थी राज्य सरकारकडे डोळे लावून बसले आहेत. सरकारमध्ये बसलेले हे लाडके भाऊ काय करतात यावर बरेच काही अवलंबून आहे. त्यामुळे राज्यातील जनतेमध्ये लाडकी बहीण तुपाशी इतर योजना उपाशी अशीच चर्चा रंगली आहे.
सुरु असलेल्या योजना रखडल्या
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना पाठिमागील दोन वर्षांपासून रखडली आहे. या योजनेच्या माध्यमातून मिळणारा लाभ नियमित, सहज, सुलभ लाभ पाठिमागील दोन वर्षांपासूनच आक्रसला होता. त्यात लाडकी बहीण योजना आल्यापासून काहीसा अधिक अकुंचीत झाला आहे. त्यामुळे राज्यभरातील महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे वेळेवर देणारे सरकार महिला व बालविकास आयुक्तालयाकडून चालवल्या जाणाऱ्या दुसऱ्या योजनेस मात्र सापत्न वागणूक का देत आहे, असा सवाल उपस्थित केला जातो आहे. (हेही वाचा, Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना किती चांगली? सांगण्यासाठी 3 कोटी रुपये मंजूर; सरकारचा केवळ प्रसिद्धीसाठी निर्णय)
गरजू मुलांच्या संगोपनासाठी योजना
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन आणि लाडकी बहीणय या दोन्ही योजना महिला व बालविकास आयुक्तालयाकडूनच चालवल्या जातात. त्यापैकी लाडकी बहीण निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने लागू केली होती. तर बालसंगोपन योजना आगोदरासूनच सुरु आहे. ही योजना विविध आजार किंवा तत्सम इतर कारणांनी जर आई किंवा वडील यांपैकी एक किंवा दोघांचेही निधन झाले तर अशा कुटुंबातील शून्य ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना आर्थिक सहाय्य आणि काळजी व संरक्षणाची गरज म्हणून ही योजना राबवली जाते. या योजनेंतर्गत या मुलांना शिक्षण आणि बालसंगोपण आदी कारणांसाठी प्रति महिना 2, 250 रुपये दिले जातात. मात्र, कोविड महामारीमध्ये आई-वडील किंवा दोघांपैकी एक गमावलेल्या मुलांना केंद्र सरकारच्या प्रायोजित योजनेंतर्गत दरमहा 4 हजार रुपये लाभ शिक्षण व संगोपनासाठी दिले जातातात. ज्याला नव्या योजनेमुळे फटका बसला आहे. राज्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचे लाभार्थी असलेल्या सुमारे 1 लाख बालकांना लाडक्या बहीण योजनेचा फटका बसला आहे. (हेही वाचा, Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना लाभावर पाणी, अनेक महिलांचे अर्ज बाद; जाणून घ्या सविस्तर)
दरम्यान, इसकाळडॉटकॉमने दिलेल्या वृत्तानुसार, या आधिच्या म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेसाठी अनुदान म्हणून मिळणारी रक्कम दरमहा 1100 रुपयांवरुन 2200 रुपये करण्याच आश्वासन दिले. ते जाहीरही केले. इतकेच नव्हे तर हे पैसे थेट हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे जमाही केले. परंतू, इतके सगळे होऊनही अद्यापपर्यंततरी हे पैस लाभार्थ्यांच्या खात्यावर जमाच झाले नाहीत. त्यामुळे बालसंगोपन योजनेंदर्गत आलेली अनेक प्रकरणे अजून तरी लाभाच्या प्रतिक्षेतच आहेत.