लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरु राहणार की बंद होणार याबाबत उलटसुलट चर्चा सुरु असतानाच आता या योजनेतील निकषात न बसणाऱ्या लाभार्थ्यांकडून दिलेल्या पैशांची वसूली होणार, अशीही चर्चा सुरु आहे. दुसऱ्या बाजूला या योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिमहिना 1500 रुपयांमध्ये वाढ करुन ती 2100 रुपयांवर (Ladki Bahin Yojana Rs 2100) नेण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे. दस्तुरखुद्द कॅबीनेट मंंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनीची ही माहिती दिल्याने लाडक्या बहिणींच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. काय म्हणाले जलसंपदा मंत्री विखे पाटील? घ्या जाणून.
निकष लावून महिलांना वगळण्याची चर्चा
विधानसभा निवडणूक 2024 पार पडल्यानंतर आणि महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर लाडकी बहीण योजना भलत्याच कारणांमुळे चर्चेत आली. कधी निकष लावून महिलांना वगळण्याची चर्चा, कधी निकषात न बसणाऱ्या महिलांना दिलेल्या गेलेल्या निधीची वसूली करण्याच्या धोरणांबाबत चर्चा तर, तर कधी योजनेचा फेरआढावा आणि अर्जांची छाननी, अशा एक ना अनेक चर्चा सुरु असताना मध्येच पुन्हा एकदा या योजनेचा हाप्ता वाढविण्याबाबत चर्चा सुरु झाली आहे. (हेही वाचा, Ladki Bahin Yojana Update: कर भरणाऱ्या महिला लाभांसाठी पात्र नाहीत; महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती)
जानेवारी महिन्यातील हप्ता अजूनही प्रलंबित
धक्कादायक म्हणजे, विधानसभा निवडणुकीनंतर पहिलाच असलेल्या जानेवारी 2025 या महिन्यातील हप्ता 20 तारीख उलटून गेली तरी आला नाही. महिन्यातील दोन आठवडे उलटून गेले तरीही या योजनेच्या हप्त्याबाबत अद्याप कोणतीही हालचाल सरकार दरबारी दिसत नाही. परिणामी सरकार हप्ता देणार तरी आहे का? असाच सवाल उपस्थित केला जातो आहे. त्याच पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या विधानावरुन आणि दिलेल्या माहितीवरुन पुन्हा एकदा 2100 रुपयांच्या हप्त्याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. (हेही वाचा, Ladki Bahin Yojana: 'महिलांनो पैसे परत करा', लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांना मंत्र्यांचे अवाहन)
अहिल्यानगर (जुने अहमदनगर) जिल्ह्याचे नवनिर्वाचीत पालकमंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटले की, राज्यातील लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांना त्यांचा हप्ता वाढवून तो 2100 रुपये केला जाणार आहे. लाडक्या बहिणी आता केवळ बहिणी राहिल्या नाहीत. त्या कुटुंबाच्या मुख्य कारभारी झाल्या आहेत. हे या योजनेचे यश आहे. अनेकदा विरोधक म्हणायचे ही योजना बंद होणार, पण झाली का? नाही ना? आता जानेवारी महिन्याच्या हप्त्यावरुनही अनेकदा बोलले जाते. पण, लवकरच हा हप्ता दिला जाईल. इतकेच नव्हे तर, मार्च महिन्यात राज्य सरकारचा अर्थसंकल्प जाहीर होईल. तेव्हा या योजनेला आणखी चालना दिली जाईल आणि राज्यातील महिलांना आता मिळणारा 1500 रुपयांचा लाभ वाढवून तो हप्ता 2100 रुपये इतका केला जाईल.