महिलांचा प्रवास सुलभ आणि आरामदायी होण्यासाठी तसेच महिला प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे मुंबई परिवहनाने आपल्या ताफ्यात 3 लेडीज स्पेशल 'तेजस्विनी' (Tejaswini Buses) बसचा समावेश केला आहे. या तिन्ही बसेस सध्या धारावी आगारात दाखल झाल्या आहेत. त्या लवकरच महिला प्रवाशांच्या सेवेसाठी धावणार आहेत.
तेजस्विनी बसेस महिलांसाठी (Ladies Special) सुरू करण्यात येणार आहेत. मुंबई बेस्टच्या ताफ्यात आणखी 37 बस खरेदी केल्या जाणार आहेत. (हेही वाचा - लेडीज स्पेशल 'तेजस्विनी' बस महिला प्रवाशांसाठी सज्ज)
महिला प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे बेस्टने तेजस्विनी बससेवेची घोषणा केली होती. राज्य सरकारच्या सहाय्याने या बसची खरेदी होत आहे. या बस शहरात गर्दीच्या वेळी केवळ महिलांसाठी चालवण्यात येणार आहेत. मुंबई महापालिकेने दिलेल्या आर्थिक निधीमुळे बेस्टच्या तिकीटदरात घट झाली.
हेही वाचा - मुंबई: BEST ची 'तेजस्विनी' बस केवळ महिला प्रवाशांसाठी; लवकरच 37 नव्या बस धावणार
तेजस्विनी बस खरेदीसाठी 11 कोटी 50 लाखांचा निधी मिळाला आहे. यातील पहिल्या टप्प्यात तीन बस खरेदी करण्यात आल्या आहेत. प्रत्येक बसची किंमत सुमारे 29 लाख 50 हजार इतकी आहे. या सर्व मिनी, नॉनएसी व डिझेलवर चालणाऱ्या बस आहेत. या बसखरेदी प्रस्तावास जुलैमध्ये बेस्ट समिती बैठकीत मान्यता देण्यात आली होती. खास महिलांच्या सुरिक्षतेतच्या दृष्टिकोनातून या बसेसची रचना करण्यात आली आहे. या बसेसमध्ये वाहन चालक जरी पुरुष असले तरी वाहक मात्र महिला असणार आहेत.