महिलांचा प्रवास सुलभ आणि आरामदायी होण्यासाठी नवी मुंबई परिवहनाने लेडीज स्पेशल 'तेजस्विनी' बस आणली आहे. तसेच केंद्र सरकारच्या अंतर्गत ही सुविधा चालू करण्यात आली आहे.
'तेजस्विनी' या लेडीज स्पेशल बसमध्ये चालकापासून ते कंडक्टर पर्यंत महिलांना या सेवेत नेमण्यात आले आहे. तर केंद्र सरकारकडून 50% पर्यंत अनुदान या बससाठी देण्यात येणार आहे. या बसचे नियमितचे वेळापत्रक ठरवून दिले आहे. त्यानुसार सकाळी 7 ते दुपारी 11 आणि त्यानंतर संध्याकाळी 5 ते रात्री 9 पर्यंत ही बस महिलांच्या प्रवाशांसाठी कार्यरत ठेवण्यात येणार आहे. मात्र या तेजस्विनी बसमध्ये गियर प्रणाली नसून पूर्णपणे ऑटोमॅटिक पद्धतीची कार्यप्रणाली देण्यात आली आहे.
नवी मुंबई परिवहनाच्या सुत्रांच्या अनुसार, येत्या दिवाळीत ही तेजस्विनी बस चालू होणार आहे. परंतु महानगर पालिकने ठरविलेल्या योजनेनुसार ही बस एप्रिल महिन्यात चालू करण्यात येणार होती. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे ही सुविधा महिलांसाठी उपलब्ध करुन देण्यास विलंब झाला असल्याचे मनपाने सांगितले आहे.