मुंबई: BEST ची 'तेजस्विनी' बस केवळ महिला प्रवाशांसाठी; लवकरच 37 नव्या बस धावणार
BEST Bus (Photo Credits: PTI)

Woman Special BEST Bus: आता चूल आणि मुल ही संकल्पना मोडत महिला त्यांच्या करिअरकडेही लक्ष देत आहेत. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावत बाहेर पडणार्‍या स्त्रियांचं प्रमाण पाहता आता सोयी आणि सुरक्षेसाठी मुंबईमध्ये विशेष बेस्ट बस धावणार आहेत. या बस 'तेजस्विनी'(Tejaswini Best Bus) या नावाने ओळखल्या जातील. नुकतीच बेस्ट बस समितीने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच केवळ महिलांसाठी विशेष बस मुंबईच्या रस्त्यांवर धावताना दिसणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर सुरूवातीला ही सेवा कफ परेड (Cuffe Parade),कुलाबा( Colaba),नरिमन पॉईंट (Nariman Point),लोअर परेल (Lower Parel) आणि मालाड (Malad) या परिसरात गर्दीच्या वेळेस 37 विशेष बस चालवल्या जाणार आहेत.

तेजस्विनी या बेस्ट बसच्या विशेष सेवेला भविष्यात मिळणार्‍या प्रतिसादावर नेमक्या कोणत्या मार्गांवर बस चालवली जाईल हे ठरवले जाणार आहे. या विशेष बसमध्ये कंडक्टरदेखील महिला कर्मचारी असेल अशी माहिती TOI शी बोलताना बेस्ट अशिकार्‍याने दिली आली आहे. सध्या वडाळा डेपोमधील बेस्ट बसमध्ये महिला कंडक्टर आहेत. तेजस्विनी विशेष बस ही नॉन एसी असेल. मुंबई: प्रतिक्षा दास होणार पहिली महिला BEST बस चालक; वयाच्या 24 व्या वर्षी बेस्ट कामगिरी

महाराष्ट्र राज्य सरकारने जाहीर केलेल्या 11 कोटींच्या विशेष तरतुदींमध्ये ही तेजस्विनी प्रकल्पासाठी विशेष निधी देण्यात आला आहे. त्यानुसार पुढील चार महिन्यात या विशेष बस मुंबईच्या रस्स्त्यांवर धावणार आहेत. काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये बेस्ट दर कपात जाहीर केल्याने अनेकांनी रिक्षा, टॅक्सींपेक्षा बेस्ट बसने प्रवास करण्याला पसंती दर्शवली आहे.