मुंबई: प्रतिक्षा दास होणार पहिली महिला  BEST बस चालक; वयाच्या 24 व्या वर्षी   बेस्ट कामगिरी
BEST bus (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रातील एस टी (MSRTC) बस नंतर आता मुंबई मधील बेस्ट बसचं (BEST Bus) स्टेअरिंग लवकरच महिलांच्या हाती येणार आहे. मुंबईमध्ये प्रतिक्षा दास (Pratiksha Das) ही अवघी 24 वर्षीय मुलगी गोरेगाव येथील डेपोमध्ये बेस्टच्या बस चालवण्याचं प्रशिक्षण घेत आहे. अल्पावधीतचं तिनं चांगला जम बसवल्याने लवकरच प्रतिक्षा बेस्ट बस चालवताना दिसणार आहे. मूळात आरटीओ ऑफिसर (RTO Officer) होण्याची इच्छा प्रतिक्षाला आहे. यासाठी अवजड वाहनांचा परवाना असावा लागतो यामधूनच बस चालवण्याची इच्छा पूर्ण झाली आहे.

ठाकूर कॉलेजमधून प्रतिक्षा दासने मॅकेनिकल इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले आहे. प्रतिक्षाला अवजड वाहनं चालवण्याची आवड असल्याने यापूर्वी तिने बाईक्स, ट्रॅक्स यासारखी अवजड वाहनं चालवू शकते. सुरूवातीला इतकी लहान मुलगी बसचं स्टेअरिंग कसं सांभाळणार? असा प्रश्न अनेकांच्या मनात आला होता मात्र या सार्‍या शंका आता दूर झाल्या आहेत. मागील सहा वर्षांपासून प्रतिक्षाला बस चालवण्याची इच्छा होती आताअखेर तिचं हे स्वप्न पूर्णत्त्वास येणार आहे. एसटी महामंडळाच्या मेगा भरती मध्ये महिला उमेदवारांसाठी शिथिल झाले नियम

बस चालवण्यासाठी बेसिक ते अ‍ॅडवान्स ट्रेनिंगसाठी प्रतिक्षाला 30 दिवसांचं ट्रेनिंग देण्यात आलं. बेस्ट बसनंतर प्रतिक्षाला विमान उडवण्याची इच्छा आहे.