MSRTC Mega Bharti 2019:  एसटी महामंडळाच्या मेगा भरती मध्ये महिला उमेदवारांसाठी शिथिल झाले नियम, प्रवेश अर्जासाठी मुदतवाढ 15 फेब्रुवारीपर्यंत
Representational Image (Photo credits: PTI)

MSRTC Mega Bharti 2019: देशात बेरोजगारीबद्दल सध्या अनेक चर्चा रंगल्या आहे. महाराष्ट्रातही बेरोजगारी मोडीत काढण्यासाठी सरकारी नोकर्‍या खुल्या केल्या जात आहे. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने (MSRTC) देखील दुष्काळग्रस्त भाग आणि उर्वरित महाराष्ट्र येथे ड्रायव्हर, कंडक्टर पदासाठी नोकर्‍या खुल्या केल्या आहेत. लवकरच एसटीचं सारथ्य महिलांच्या हातामध्ये दिले जाणार आहे. त्यासाठी भरती प्रक्रियेमधून निवडलेले उमेदवार जर महिला असेल तर त्यांना एसटी महामंडळाकदून अवजड वाहन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. काही नियमांमध्ये आता महिलांसाठी शिथिलता आणली आहे.

महिलांसाठी नियम शिथिल

एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केलेल्या घोषणेनुसार, महिलांना एसटी महामंडळ प्रशिक्षण देईल. महिला उमेदवारांना शारीरीक उंचीच्या अटीमध्येही सवलत देण्यात आली असून ही अट किमान 160 सेंमीवरुन किमान 153 सेंमी करण्यात आली आहे. हलके वाहन चालविण्याचा अनुभवदेखील 3 ऐवजी आता एका वर्षाचा करण्यात आला आहे. MSRTC Recruitment 2019: ST मध्ये 3606 नव्या जागांसाठी भरतीची घोषणा; 10% सवर्ण आरक्षणाचा फायदा घेत जाणून घ्या कसा आणि कुठे कराल अर्ज?

महिलांना 30% नोकरीत आरक्षण असल्याने 2406 पदांसाठी महिला निवडल्या जातील. दुष्काळग्रस्त भागासाठी अर्ज करण्याच्या तारखेस 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे. 24 फेब्रुवारी रोजी यासाठी एसटीकडून प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. ज्या महिलांची निवड होईल त्यांना महामंडळामार्फत 1 वर्ष अवजड वाहन चालविण्याचे प्रशिक्षण मिळेल. प्रशिक्षण कालावधीत महिलांना महामंडळामार्फत स्टायपेंटदेखील मिळणार आहे.