Mumbai News: मेट्रोच्या बांधकामाच्या ठिकाणी विजेचा शॉक लागल्याने मजूराचा मृत्यू,ठेकेदारावर गुन्हा दाखल
Representational Image

Mumbai News: वांदे पूर्व येथील बीकेसीच्या कास्टिंग यार्डमध्ये मेट्रोच्या (Metro) बांधकामाच्या ठिकाणी विजेचा शॉक (Electric shock) लागल्याने एका 28 वर्षीय मजुराचा मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी घडली आहे. या घटनेअंतर्गत बीकेसी पोलिसांनी ठेकेदार अरविंद यादव (50) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- फ्रीजचा शॉक लागून 4 वर्षांच्या मुलीचा मृत्यू)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री 8 वाजता राजबहादूर यादव एमएमआरडीए मैदान, कास्टिंग यार्ड, बीकेसी, वांद्रे पूर्व येथील मेट्रो प्रकल्पात काम करत होते. मृत तरुण सर्व्हिसमध्ये कामाला होता. यादव आणि इतर कामगार हायड्रोलिक ट्रेलर (MH06 AQ 6411) वर गर्डर आणण्याच्या तयारीत होते. दरम्यान जवळच आणखी एक कामगार वेल्डिंगचे काम करत होते. यादव आणि त्यांचे सहकारी हातमोजे न घालता काम करत होते. यादव यांनी हातात मोजे न घालता ट्रेलरची पिन काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांना विजेचा धक्का बसला. इतर दोन कामगारांनी यादव यांना मदत करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही विजेचा करंट लागला आणि शॉक लागल्याने ते खाली पडले. दुसऱ्या एका कामगाराने तातडीने विद्युत कनेक्शन तोडले.

या घटनेत जखमी झालेल्या कामगारांना वांद्रे पश्चिम येथील भाभा रुग्णालयात नेण्यात आले, तेथए तपासणीनंतर एका कामगारा मृत घोषित केले. अन्य दोन मजुरांवर उपचार सुरू करण्यात आले. या घटनेनंतर पोलिसांनी ठेकेदार अरविंद यादव यांच्यावर गुन्हा दाखल करून घेतला आहे. निष्काळजीपणामुळे एका मजुराचा मृत्यू झाल्याची खळबळ उडाली आहे.