फ्रीजचा शॉक लागून एका 4 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नाशिकच्या सिडको शेजारील त्रिमूर्ती चौकातील एका आईस्क्रीमच्या दुकानातील फ्रीजचा शॉक लागल्याने एका चार वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. पोलिसांच्या अहवालात दावा केला आहे की, त्रिमूर्ती चौक शेजारील रहिवासी विशाल कुलकर्णी हे त्यांची 4 वर्षांची मुलगी ग्रीष्मा हिच्यासोबत त्यांच्या घराजवळील एका दुकानात आईस्क्रीम घेण्यासाठी गेले होते. यावेळी मुलीने फ्रीजला हात लावताच तिला शॉक बसला. ग्रीष्माला ताबडतोब सरकारी रुग्णालयात नेले, जिथे वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. स्थानिक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)