Devendra Fadnavis On Kunal Kamra: विनोदी कलाकार कुणाल कामरा (Kunal Kamra) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबद्दल केलेल्या 'देशद्रोही' वक्तव्यावरून (Traitor Remark) सुरू असलेल्या वादावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सोमवारी माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी कामरा यांनी स्टँड-अप कॉमेडियन म्हणून त्यांच्या स्वातंत्र्याचा गैरवापर केल्याचं म्हणत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच अशा प्रकारच्या वक्तव्य सहन केले जाणार नाही असं सांगत कामरा यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
खरा देशद्रोही कोण हे जनतेने आधीचं ठरवले आहे -
यासंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'स्टँड-अप कॉमेडी करण्याचे स्वातंत्र्य आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की ते, काहीही बोलू शकतात. महाराष्ट्रातील जनतेने आधीच ठरवले आहे की खरा देशद्रोही कोण आहे. कुणाल कामरा यांनी माफी मागावी. हे सहन केले जाणार नाही. विनोदाला परवानगी असली तरी, आमच्या उपमुख्यमंत्र्यांना जाणूनबुजून बदनाम करण्यासाठी त्याचा वापर करणे स्वीकारार्ह नाही.' (हेही वाचा -Kunal Kamra Song on Eknath Shinde: कॉमेडियन कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टिप्पणीवरून वाद; FIR दाखल, संतप्त शिवसैनिकांनी हॉटेल आणि स्टुडिओची केली तोडफोड (Video))
इतरांच्या स्वातंत्र्यावर आणि विचारसरणीवर अतिक्रमण करण्याचा कोणालाही अधिकार नाही -
दरम्यान, कामरा यांच्या लाल संविधान पुस्तकाच्या सोशल मीडिया पोस्टचा संदर्भ देत देवेंद्र फडणवीस म्हणाले, राहुल गांधींनी एकदा दाखवलेले पुस्तक त्यांनी पोस्ट केले आहे, परंतु त्यापैकी कोणीही प्रत्यक्षात ते वाचलेले नाही. संविधान अभिव्यक्ती स्वातंत्र्य देते, परंतु त्या स्वातंत्र्याला मर्यादा येतात. महाराष्ट्रातील लोकांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांची निवड केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या जनादेश आणि विचारसरणीचा विश्वासघात करणाऱ्यांना मतदारांनी त्यांची जागा दाखवून दिली. विनोदाचे स्वागत आहे, परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अपमानास्पद विधाने समर्थनीय ठरू शकत नाहीत. इतरांच्या स्वातंत्र्यावर आणि विचारसरणीवर अतिक्रमण करण्याचा कोणालाही अधिकार नाही, असंही यावेळी देवेंद्र फडवणवीस यांनी नमूद केलं. (हेही वाचा -Kunal Kamra Song on Eknath Shinde: कुणाल कामराच्या एकनाथ शिंदेंवरील टिपण्णीनंतर शिवसेना खासदार Naresh Mhaske यांची धमकी, म्हणाले- 'भारतात कुठेही मोकळेपणाने फिरू देणार नाही' (Video))
पहा व्हिडिओ -
Mumbai, Maharashtra: CM Devendra Fadnavis says, "The way stand-up comedian Kunal Kamra has attempted to insult Maharashtra’s former Chief Minister and current Deputy Chief Minister Eknath Shinde through a song is wrong, and we strongly condemn it. Such actions cannot be… pic.twitter.com/EEYKkXDPez
— IANS (@ians_india) March 24, 2025
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून हॅबिटॅट कॉमेडी क्लबची तोडफोड -
तत्पूर्वी, कामरा यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना (शिंदे गट) च्या कार्यकर्त्यांनी खार येथील त्यांच्या हॅबिटॅट कॉमेडी क्लबची तोडफोड केली. त्यानंतर हा वाद आणखी चिघळला. त्यांच्या वक्तव्याच्या व्हायरल क्लिपमुळे शिंदे यांचे समर्थक संतप्त झाले. त्यांनी हॅबिटॅट क्लबमधील मालमत्तेची तोडफोड केली. तथापि, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खार पोलिस ठाण्यात कामरा यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आणि कठोर कारवाईची मागणी केली.
दरम्यान, सोमवारी मुंबईतील अंधेरी येथील एमआयडीसी पोलिसांनी कामरा यांच्याविरुद्ध खोटी विधाने किंवा अफवा पसरवल्याच्या आरोपाखाली झिरो एफआयआर नोंदवला. ही तक्रार शिवसेना (शिंदे) आमदार मुरजी पटेल यांनी दाखल केली होती, ज्यांनी कामरा यांच्यावर दिशाभूल करणारी आणि बदनामीकारक विधाने केल्याचा आरोप केला.