Kunal Kamra (Photo Credit: Facebook)

Kunal Kamra Controversy: स्टँड-अप कॉमेडियन (Stand-up comedian) कुणाल कामरा (Kunal Kamra) याने एका बँकरची माफी माहितली आहे. सोशल मीडिया मंच एक्स (आगोदरचे ट्विटर) वर लिहीलेल्या पोस्टमध्ये त्याने ही माफी मागितली आहे. इतकेच नव्हे तर त्याने या बँकरला एक खास ऑफरसुद्धा दिली आहे. कामरा याच्या मुंबई येथील कार्यक्रमास कथितरित्या हजर राहिल्यानंतर पोलिसांनी या बँकरला चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे. स्टँड-अप कॉमेडियन सध्या वादाच्या भोवऱ्यास सापडला आहे. एका कार्यक्रमता सादर केलेल्या विडंबनात्मक गाण्यामध्ये त्याने कथीतरित्या विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची खिल्ली उडवल्याचा आणि त्याचा उल्लेख गद्दार असा केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या प्रकरणात कामरा याच्यावर पोलिसांची करडी नजर असून, त्याला आतापर्यंत तीन समन्स पाठविण्याता आली आहेत. तसेच, त्याच्या सर्वात अलिकडील झालेल्या कार्यक्रमास उपस्थिती लावणाऱ्या प्रेक्षकांचीही चौकशी केली जात आहे.

कार्यक्रमास हजर राहिल्याबद्दल चौकशी

सशल मीडियावरील माहती आणि प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सदर बँकर सुट्टी साजरी करण्यासाठी सध्या राज्याबाहेर गेला आहे. असे असताना त्याला मुंबई पोलिसांनी समन्स पाठविले ज्यामुळे त्यास आपला सुट्टी दौरा अर्धवट सोडून चौकशीसाठी परत यावे लागले. त्यामुळे स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने नवी मुंबईतील एका बँकरची माफी मागितली आहे. शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करणाऱ्या विनोदांबद्दल कामरावर दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात बँकरला साक्षीदार म्हणून बोलावण्यात आले होते. (हेही वाचा, Kunal Kamra ला मुंबई पोलिसांचं तिसरं समन्स; 5 एप्रिलला हजर राहण्याचे आदेश)

कुणाल कामरा याची खास ऑफर

कुणाल कामरा याने सदर बँकरवर उद्भवलेल्या परिस्थितीवर खेद व्यक्त केला आणि त्यास भारतातील कोणत्याही ठिकाणी बँकरसाठी सुट्टी प्रायोजित करण्याची ऑफर दिली. 'माझ्या शोमध्ये सहभागी झाल्यामुळे तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल मी मनापासून दिलगीर आहे. कृपया मला ईमेल करा, जेणेकरून मी तुमची पुढची सुट्टी भारतात कुठेही शेड्यूल करू शकेन," असे कामरा यांने X वर पोस्ट केले. (हेही वाचा, Comedian Kunal Kamra Row: कुणाल कामरा याच्या मुंबईतील निवासस्थानी Mumbai Police दाखल)

बँकरला समन्स

  • तामिळनाडू आणि केरळच्या 17 दिवसांच्या सहलीवर निघालेल्या या बँकरशी 28 मार्च रोजी मुंबई पोलिसांनी संपर्क साधला आणि 30 मार्च रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले. त्याने असा दावा केला की, अधिकाऱ्यास त्याच्या शहराबाहेर असण्यावर संशय होता आणि त्याने त्याच्या खारघर निवासस्थानी जाण्याची धमकीही दिली, ज्यामुळे तो सुट्टीहून लवकर परतला.
  • शोचे तिकीट ऑनलाइन खरेदी केल्याचा पुरावा सादर करूनही, बँकर म्हणाला की पोलिसांना संशय आहे की, त्याने कामराच्या शोचा व्हिडिओ एडिट केला असावा. "कॉमेडियन त्याच्या शोचा व्हिडिओ एडिटिंगसाठी मला का देईल?" असाही सवाल बँकरने केला.
  • दरम्यान, मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले की, मुंबईतील हॅबिटॅट स्टुडिओमध्ये रेकॉर्ड केलेल्या कामराच्या वादग्रस्त कॉमेडी शो 'नया भारत' च्या उपस्थितांना कोणतीही अधिकृत सूचना पाठवण्यात आली नव्हती. 24 मार्च रोजी युट्यूबवर प्रदर्शित झालेल्या या शोमध्ये एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवणाऱ्या 'भोली सी सूरत' या लोकप्रिय बॉलीवूड गाण्याच्या विडंबनामुळे टीका झाली.

कुणाल कामराची ऑफर काय?

शोच्या रिलीजनंतर, शिंदे यांच्या समर्थकांनी स्टुडिओची तोडफोड केली आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) इमारतींच्या उल्लंघनाचा उल्लेख करून पाडकाम मोहीम राबवली, ज्यामुळे कारवाईच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.

कामरा यांच्यावर सध्या तीन पोलिस खटले सुरू आहेत, परंतु मद्रास उच्च न्यायालयाने त्यांना अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले आहे. या घटनेमुळे राजकीय वादळ निर्माण झाले आहे, विरोधी पक्षांनी सत्ताधारी एनडीए सरकारवर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला केल्याचा आरोप केला आहे, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचा बचाव करत म्हटले आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली बेपर्वा विधाने खपवून घेतली जाणार नाहीत.