कोरेगाव-भीमा प्रकरण: केंद्र सरकारच्या निर्णयावर राज्य गृहमंत्री अनिल देशमुख संतापले; म्हणाले...
Anil Deshmukh | Photo Credits: Twitter

एल्गार परिषदेचा तपास केंद्र सरकारने (Central Government) राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (National Investigation Agency) सोपवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एसआयटी मार्फत तपास करण्याची मागणी केली होती. राज्य सरकारकडून या प्रकरणाचा आढावा घेण्यात येत असताना, केंद्राने हे प्रकरण एनआयएकडे वर्ग केले आहे. यावरून राज्य गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केंद्र सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, अनिल देशमुख यांनी ट्विट केले आहे. त्यावेळी ते म्हणाले की, कोरेगाव भीमा येथील प्रकरणाचा तपास राज्य सरकार करत होते. मात्र, आज अचानक केंद्र सरकारने राज्य सरकारची पूर्व परवानगी न घेता या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे दिला आहे. याबद्दल अनिल देशमुख यांनी केंद्र सरकारच्या भुमिकेचा निषेध नोंदवला आहे.

कोरेगाव भीमा प्रकरणाची चौकशी एसआयटी. मार्फत करावी, अशी मागणी करणारे पत्र शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले होते. परंतु आता केंद्र सरकारने एल्गार परिषदेचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयकडे देऊन एक प्रकारे राज्य सरकारवर कुरघोडी केली आहे. कोरेगाव भीमा येथे 2 वर्षापूर्वी झालेल्या दंगली प्रकरणी झालेल्या तपासावर शरद पवार यांनी संशय व्यक्त केला होता. बुद्धीजीवी लोकांना मुद्दाम या प्रकरणात गोवण्यात आल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला होता. आता केंद्र सरकारने हा तपास स्वत: हून एनआयएकडे सोपावला आहे. यावर अनिल देशमुख यांनी संतप्त प्रतिक्रिया दर्शवली आहे. महाराष्ट्रराज्य सरकारने कोरेगाव-भीमा घटनेच्या मुळाशी जाण्याचे ठरविल्यानंतर केंद्र शासनाने हस्तक्षेप करून राज्य शासनाची कोणतीही परवानगी न घेता हा तपास NIA कडे दिला हे घटनेच्या विरोधात आहे केंद्राच्या या निर्णयाचा मी निषेध करतो, असे ट्विट अनिल देशमुख यांनी केले आहे. हे देखील वाचा- एल्गार परिषदेचा तपास केंद्र सरकारने एआयएकडे सोपावला

अनिल देशमुख यांचे ट्विट-

केंद्र सरकारने माजी कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानाची झेड सुरक्षा काढून घेतली. शरद पवार यांनी केंद्रात अनेक महत्वपूर्ण मंत्रिपदांवर काम केले आहे. यातच केंद्र सरकारने केवळ सुडाच्या भावनेतून त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानाची सुरक्षा कपात केल्याचा आरोपही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.