कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातील (Bhima Koregaon Violence) आरोपी स्टॅन स्वामी (Stan Swamy Passes Away At 84) यांचे आज निधन झाले आहे. स्मामी यांनी वयाच्या 84 वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. स्मामी हे बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना 30 मे रोजी मुंबईतील होली फॅमिली रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. दरम्याम, रविवारी स्टॅन स्वामीची तब्येत अचानक खराब झाली. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. आज अखेर उपचारादरम्यान दुपारी दीड वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
स्टेन स्वामी यांचे वकील मिहीर देसाई यांनी आज सकाळी त्यांच्या तब्येत बिघडल्याची माहिती दिली होती. त्यांनी सांगितले की. रविवारी वडील स्टॅन स्वामी वेंटिलेशनवर होते. दरम्यान, 28 मे रोजी त्यांना कोर्टाच्या आदेशानुसार स्वामी यांच्यावर हॉली फॅमिली रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या उपचाराचा खर्च त्यांच्या सहकाऱ्यांकडून घेण्यात येत होता. वकील देसाई यांनी शनिवारी न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन.जे. जमादार यांच्या खंडपीठाला सांगितले की स्वामींची प्रकृती चिंताजनक असून तो अजूनही आयसीयूमध्ये आहेत. हे देखील वाचा- Mumbai Drug Case: गॅंगस्टर Chinku Pathan च्या गोटातील Sonu Pathan ला Narcotics Control Bureau कडून अटक
वैद्यकीय कारणास्तव स्वामींच्या जामीन अर्जावरील सुनावणी खंडपीठाने मंगळवारी पुढे ढकलली आणि त्यांना तोपर्यंत रुग्णालयातच राहण्यास सांगितले. गेल्या आठवड्यात स्वामींनी बेकायदेशीर कृती प्रतिबंधक कायद्याच्या (यूएपीए) कलम D 43 ड D (5) ला आव्हान देणारी न्यायालयात नवीन याचिका दाखल केली असून कायद्यानुसार आरोपीच्या जामिनावर कडक अटी लावल्या आहेत. त्यांना भीमा कोरेगाव प्रकरणात रांची येथून अटक करण्यात आली होती. कॉंग्रेस आणि झामुमो यांच्यासह अनेक आदिवासी संघटनांनी त्यांच्या अटकेला विरोध दर्शविला होता.