
कोकणामध्ये जाणार्या पर्यटकांची वाढती संख्या पाहता आता त्यांना रेल्वे प्रवासामध्ये अधिक सुविधा देण्याकडे कोकण रेल्वेचा कल आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, कोकण रेल्वे देखील आता रो रो फेरी बोट प्रमाणे रेल्वेतून पर्यटकांना त्यांचं वाहन देखील घेऊन जाण्याची सुविधा देण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. आगामी गणेशोत्सवामध्ये जर अपेक्षित मागणी समोर आली तर तर ही सुविधा देण्याचा विचार केला जाईल असं रेल्वेच्या एका अधिकार्याने सांगितले आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी मंगळवारी नवी मुंबईतील बेलापूर येथील केआरसीएल मुख्यालयात पत्रकारांना सांगितले की, जर एका वेळी किमान 40 गाड्या वाहून नेल्या गेल्या तर अशी सेवा चालवणे शक्य होईल.
गणपती उत्सवादरम्यान केआर त्यांच्या अग्रगण्य रो-रो सेवांद्वारे प्रवासी गाड्यांची वाहतूक का करत नाही असे विचारले असता, झा म्हणाले की त्यांना गाड्यांची वाहतूक करण्यासाठी बदल करावे लागतील. कोकण रेल्वेची रो-रो सेवा, जी वाहनांना त्यांच्या चालकांसह वाहतूक करण्यास परवानगी देते, पण सध्या ती केवळ ट्रकसाठी वापरली जाते.
गणपतीच्या दिवसांमध्ये एक विशेष रोरो ट्रेनच जाहीर करण्याचा मानस आहे असे अधिकाऱ्याने सांगितले आहे. नक्की वाचा: Mumbai-Goa Ro-Ro Boat Services: रो रो बोट सर्व्हिसने 4 तासात यंदा गणपतीला कोकणवासीय गावी पोहचणार? पहा काय म्हणाले मंत्री नितेश राणे .
कोकण रेल्वेचं पावसाळी वेळापत्रक जारी
कोकण रेल्वे पावसाच्या दिवसात सुरक्षेच्या दृष्टीने गाडी थोड्या मंद वेगात चालवतात. तसेच ट्रेन सुटण्या-पोहचण्याच्या वेळेतही बदल करते. नुकतचं कोकण रेल्वेचं पावसाळी वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. त्यामध्ये ट्रेनचा वेग 40 km/h होणार आहेत तर पावसाळी वेळापत्रक 15 जून ते 20 ऑक्टोबर चालवलं जाणार आहे. वीर, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, कुडाळ, वेर्णा, कारवार, भटकळ आणि उडुपी या नऊ प्रमुख ठिकाणी रेल्वे मेंटेनन्स व्हेइकल्स (RMVs) तैनात ठेवली जाणार आहेत.