Mumbai: ठाणे स्थानकावर 20 वर्षीय महिलेची प्रसूती, 1 Rupee Clinic च्या कर्मचाऱ्यांचे यश
20 Year Old Woman Gave Birth To Child At Thane Station (Photo Credit: ANI)

भारतीय रेल्वेला (Indian Railway) लाईफलाईन का म्हणतात याचं उत्तम उदाहरण नुकतंच मध्य रेल्वे (Central Railway) च्या ठाणे (Thane Station) स्थानकावर पाहायला मिळालंय. कोंकण कन्या (Konkan Kanya Express)  या मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या  एक्सप्रेसने प्रवास करत असणाऱ्या 20 वर्षीय गरोदर महिलेला अचानक पोटात वेदना सुरु झाल्याने तिला ठाणे स्थानकावर  उतरवण्यात आले त्यानंतर जवळील वन रुपी क्लिनिक (1 Rupee Clinic) मधील कर्मचाऱ्यांनी स्टेशनवरच तिची प्रसूती केली. या नंतर बाळ व बाळंतिण दोघेही सुखरूप असल्याची माहिती देण्यात आली.

या प्रकारच्या अनेक घटना या पूर्वीदेखील पाहायला मिळाल्या आहेत. प्रवास दरम्यान प्रवाश्यांची सोया उत्तम व्हावी याची तरतूद करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या शिरपेचात हा एक मनाचा तुरा जोडला गेलाय. हवाई प्रवासादरम्यान महिला बाळंत, जकार्ताला जाणाऱ्या विमानाचे मुंबईत एमरजन्सी लॅंडीग

ANI ट्विट

या नवजात बालक व वीस वर्षीय आई सोबत योग्य वेळी प्रसूतीची मदत करणाऱ्या वन रुपी क्लिनिक मधील कर्मचारिकेचा फोटो देखील सोशल मीडियावर पाह्यला मिळत आहे. ही प्रसूती करणारी कर्मचारिका देखील साधारण समान वयाची असल्याचा अंदाज लावत तिच्या समय सूचक कामगिरीसाठी नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

वन रुपी क्लिनिक ही सर्वसामान्य नागरिकांना कमी दरात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तयार करण्यात आलेली संस्था आहे. मध्य रेल्वेच्या सोबतीने मुंबईतील प्रमुख रेल्वे स्थानकांवर या क्लिनिकच्या शाखा उघडण्यात आल्या आहेत.