
कोंढवा (Kondhwa) भागामध्ये एका तरूणीने डिलेव्हरी बॉय बनून आलेल्या मुलाने आपल्यावर बलात्कार केल्याचे आरोप केल्याने पुण्यामधील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न विचारले जात होते. पण आता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बनाव आहे. तो मुलगा डिलेव्हरी नसून पीडीतेचा मित्र होता असे पोलिसांनी सांगितले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या माहितीनुसार, कोंढवा बलात्कार प्रकरणातील पीडीतेने खोटी तक्रार दाखल असून हे करण्यापूर्वी तिने आपल्या प्राध्यापिकेकडून मार्गदर्शन घेतल्याचा संशय आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, "पीडीतेनेच तिच्या मित्राला घरी बोलावले होते. तिच्या संमतीने सेल्फी काढण्यात आला आणि नंतर तो एडिट करण्यात आला. दोघांमध्ये वाद झाले आणि त्याच्या नंतर तरूणीने खोटी तक्रार दाखल केली. आरोपीचा घरात जबरदस्तीने प्रवेश, तिच्यावर बलात्कारापूर्वी स्प्रे हे सारे खोटे दावे आहेत. पोलिसांनी 24 तासांतच हे खोटे दावे समोर आणले आहेत.
. मित्रा समोर बसवून तिची चौकशी झाल्यानंतर वारंवार तिने आपल्या तक्रारीमध्ये बदल केल्याचं निदर्शनास आल्याचेही समोर आले आहे. दरम्यान पोलिसांकडून तिने ज्या प्रोफेसर सोबत बोलून अशा प्रकारे खोटी तक्रार दिली आहे त्याचाही तपास सुरू आहे. सध्या पीडीत तरूणीचे मानसोपचार तज्ञांकडून समुपदेशन सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. नक्की वाचा: Pune Shoker: 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, लग्नासाठी जबरदस्ती; पुणे येथील धक्कादायक घटना.
पोलिसांनी पीडीत तरूण आणि संशयित आरोपीचे यापूर्वी फोन वर झालेले बोलणे, चॅट्स समोर आणले आहेत. दरम्यान सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे तरूण कधी आला, कधी गेला याची माहिती तपासण्यात आली असून सोसायटी मधील अन्य रहिवाशांना देखील तरूणाचा फोटो दाखवून माहिती विचारण्यात आल्याचं सांगण्यात आले आहे.