कोल्हापूर आणि सांगली येथे 100 डॉक्टर्स रवाना, औषधांचा तुटवडा नाही- देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस (Photo Credits- ANI)

आज (10 ऑगस्ट)  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सांगलीत दाखल झाले असून त्यांनी तेथील पुरस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्या सोबत गिरिश महाजन आणि चंद्रकांत पाटील सुद्धा दिसून आले. पुरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर फडणवीस यांनी एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी कोल्हापूर आणि सांगली येथे 100 डॉक्टर्संची टीम रवाना करण्यात आली असल्याचे सांगितले. तसेच तेथे आता औषधांचा तुडवटा भासणार नसल्याचे ही त्यांनी म्हटले आहे.

सांगलीत पुर ओसरत चालला असून तेथील नागरिकांना पिण्याचे पाणी आणि विजेचा पुरवठा करण्याकडे भर देणार असल्याचे पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी म्हटले. तसेच शिरोळ येथे विशाखापट्टणम येथून नेव्हीची एक टीम येथे दाखल करण्यात आली असून 95 बोटी सांगली येथे नागरिकांच्या मदतीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.(मुख्यमंत्री सांगली मध्ये दाखल; हिराबाग कॉर्नर परिसरातून पूरग्रस्त भागाची पाहणी)

मात्र अद्याप कोल्हापूर जिल्ह्यातील हसूर आणि नृसिन्हवाडी येथे पाण्याची पातळी अद्याप कमी झालेली नाही. त्याचसोबत या पुरस्थितीमधून नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र नागरिकांना ज्या ठिकाणी सुरक्षित हलवता येणार आहे तेथे त्यांना अन्नधान्याचा पुरवठा केला जाणार आहे.