
Kolhapur November 2020 Kirnotsav Sohala: कोल्हापुरची करवीरनिवासनी अंबाबाई म्हणजेच महालक्ष्मी मंदिरात (Mahalaxmi Mandir) यंदाचा नोव्हेंबर महिन्यातील किरणोत्सव सोहळा सुरू झाला आहे. दरम्यान वर्षातून दोनदा अंबाबाईच्या भक्तांना या नयनरम्य सोहळा अनुभवता येतो. नोव्हेंबर महिन्यातील किरणोत्सव 2020 (Kirnotsav) ची सुरूवात यावर्षी 9 नोव्हेंबरपासून झाली आहे. आज या किरणोत्सव सोहळ्याचा तिसरा दिवस आहे. या किरणोत्सवात सूर्याची मावळती किरणं टप्प्या टप्प्याने दरवर्षी मंदिरात पडतात. पायापासून चेहर्यापर्यंत तीन टप्प्यात ती पडतात. आणि मूर्ती व मंदीर परिसर उजाळून निघतो.
किरणोत्सवाच्या दिवसांत सूर्यास्तापूर्वी काही क्षण सूर्याची किरणे पहिल्या दिवशी महालक्ष्मी देवीच्या चरणावर दुसऱ्या दिवशी छातीवर आणि तिसऱ्या दिवशी चेहर्याला स्पर्श करतात. सुमारे 150 मीटर हून अधिक अंतर कापून ही किरणे महाद्वार कमानीतून येणारी ही किरणं गरुड मंडप गणेश मंडप मध्य मंडप अंतराल मंडप गर्भागार अशा रस्त्याने देवीच्या भेटीला येतात तेव्हा मंदिरातले सर्व विद्युत दिवे बंद केले जातात. किरणांचा स्पर्श झाल्यानंतर घंटानाद आणि आरती करण्याची प्रथा आहे.
किरणोत्सव 2020 ची झलक
दरवर्षी कोल्हापूरच्या मंदिरामध्ये नोव्हेंबर महिन्यात 9,10,11 आणि 31 जानेवारी, 1 फेब्रुवारी, 2 फेब्रुवारी दिवशी किरणोत्सव अनुभवता येतो. तो पाहण्यासाठी हमखास भक्त मंदिरामध्ये येतात. दरम्यान यंदा कोरोना संकटकाळामुळे महाराष्ट्रात मंदिरं बंद आहेत. त्यामुळे भाविकांना यंदा मंदिरात देवीचं दर्शन आणि किरणोत्सव पाहता येत नाही. परंतू हा सोहळा भक्तांना ऑनलाईन पाहता येणार आहे.