Gunratna Sadavarte | (File Image)

कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने (Kolhapur District Sessions Court) अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा कोल्हापूर पोलिसांनी (Kolhapur Police) घेतल्यानंतर त्यांना राजारामपूरी पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर कायद्याप्रमाणे त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. पोलीस आणि बचावपक्षाचे युक्तीवाद ऐकूण घेतल्यानंतर न्यायालाने सदावर्ते यांना पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांनी सदावर्ते यांची सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. दरम्यान, कोल्हापूर पाठोपाठ आता पुणे येथेही गुणवंत सदावर्ते यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे.

सरकारी वकील आम्रपाली कस्तुरे यांनी बाजू मांडली तर वकील शिवाजीराव राणे यांनी फिर्यादींच्या वतीने कोर्टात बाजू मांडली. सदावर्ते यांच्या वतीने पीटर बारदेस्कर यांनी युक्तवाद केला. दरम्यान, सदावर्ते यांना सातारा पोलिसांकडून कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. सातारा जिल्हा सत्र न्यायालायने सदावर्तेन यांना काहीसा दिलासा देत न्यायालयीन कोठडी दिली होती. मात्र, कोल्हापूर कोर्टाने पोलीस कोठडी दिल्याने पुन्हा एकदासदावर्ते यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. (हेही वाचा, Gunratna Sadavarte यांना दिलासा नाहीच; सातारा न्यायालयाने वाढवली 4 दिवसांची पोलिस कोठडी)

मराठा समाज समन्वय समितीचे दिलीप मधुकर पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सदावर्ते यांच्या विरोधात कोल्हापूर येथील शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होता. भादंसं कलम 153 अन्वये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल होता. गुणवंत सदावर्ते यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सामाजिक तेढ, एकोप्याला बाधा निर्माण होऊ शकते, अशी तक्रार तक्रारदाराने दिली होती. दरम्यान, मराठा आरक्षणास विरोध करण्यासाठी न्यायालयीन लढा लढण्यासाठी सदावर्ते यांनी पैसे जमवले होते. हे पैसे त्यांनी बेकायदेशीर मार्गाने जमल्याचा तसेच, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचाही अपमान केल्याचा आरोप तक्रारदाराने केला होता. त्यावरुन सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.