CM Uddhav Thackeray | (Photo Credit: Twitter)

[Poll ID="null" title="undefined"]मुसळधार पावसामुळे आलेल्या महापूरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आज (30 जुलै) कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते विविध ठिकाणांना भेट देऊन झालेल्या नुकसानीची (Kolhapur Floods) पाहणी करतील. दरम्यान, नियोजित दौऱ्यानुसार त्यांनी आज शिरोळ तालुक्यातील नृरसिंहवाडी (Nrusinhawadi) गावाला भेट दिली. या वेळी पूरग्रस्तांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या वेळी काही ग्रामस्थांनी पूनर्वसनाची मागणी केली. या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांचा सर्व बाजूंनी विचार करु. पण असे किती दिवस चालणार? असा सवाल विचारत तुम्ही सगळे जर एकत्र या. हा विषय तातडीने मार्गी लावू असे अवाहन उद्धव ठाकरे यांनी या वेळी केले.

नृरसिंहवाडी येथील दौऱ्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिरोळ येथील निवारा केंद्रात असलेल्या नागरिकांशी संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटम्यासाठी नागरिकांची इतक्या मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती की ती आवरताना पोलीस प्रशासनाचीही दमछाक होत होती. या वेळी महिला आणि नागरिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्ही सगळेजण एकत्र येऊन पूनर्वसनाची मागणी करा. आम्ही ते लगेच मंजूर करु. नाहीतर प्रत्येक वेळी पाऊस येणार, पूर येणार आणि आम्ही तुम्हाला भेटत राहणार. असं किती दिवस चालायचं, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यातील कोरोना व्हायरस महामारीचे संकट गेले नाही. ते अद्यापही कायम आहे. त्यामुळे मास्क लावणे आवश्यक आहे, अशी आठवणही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना करुन दिली. (हेही वाचा, Maharashtra Weather Forecast: ठाणे, रायगड, पुणे जिल्ह्यांसह विदर्भात पुढील चार दिवस पर्जन्यवृष्टीचा इशारा)

दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही पूरग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. आज त्यांनी कोल्हापूरातील चिखली गावचा दौरा केला. या दौऱ्यात ग्रामस्थांच्या प्रचंड रोशाचा सामना त्यांना करावा लागला. तुम्ही मुख्यमंत्री असताना आम्हाला याच ठिकाणी अश्वासन दिले होते. त्याचे काय झाले? असा रोखडा सवाल ग्रामस्थांनी विचारला. यावर आम्ही अश्वासन दिल्यानंतर अल्पावधीतच आमचे सरकार गेले. त्यामुळे आम्हाला विशेष काही करता आले नाही, असे सांगून फडणवीस यांना वेळ मारुन न्यावी लागली.