धैर्यशील माने (Photo Credits-Facebook)

कोल्हापूर येथे पुरग्रस्त महिलांनी शुक्रवारी आंदोलन केले होते. त्यानंतर आज याच महिलांनी आज शिवसेना खासदार धैर्यशील माने यांच्या समोर पंचगंगा नदीच्या पात्रात उड्या मारल्या. मायक्रो फायनान्स यांच्याकडून घेण्यात आलेले कर्ज माफ करावे म्हणून शिरोळा तालुक्यात महिलांनी जोरदार आंदोलन करण्यास सुरुवात केली. मात्र महिलांचे हे आंदोलन आक्रमक झाल्याचे दिसून आले.

पुरग्रस्त महिलांच्या आर्थिक गोष्टींकडे स्थानिक प्रशासनाकडून दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर महिलांनी पंचगंगा नदीच्या पात्रात उड्या मारल्या. अग्निशमन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांनी तातडीने नदीमध्ये उड्या घेत महिलांना पाण्यातून बाहेर काढले. या सगळ्या प्रकारात एक महिला आंदोलक बेशु्द्ध झाली.('शिवभोजन नाव बदलून अटीभोजन करा' नीलेश राणे यांचा शिवसेनेला टोला)

 तर काही दिवसांपूर्वी महिलांच्या या आंदोलनाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळला होता. यामध्ये पोलीस प्रशासन त्यांना समजवण्याचा प्रयत्न करताना आले. पण अगदीच नाईलाआज झाल्याने यापैकी काही महिलाना पोलिसांनी गाडीत बंद करून देखील ठेवले आहे पण जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हटणार नाही असा ठाम पवित्र स्वीकारून महिला सातत्याने घोषणा दिल्या होत्या. आमच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर खुर्च्या खाली करा अशी घोषणाबाजी करताना महिलांनी उद्धव ठाकरे यांच्या सरकारला थेट इशारा दिला होता.