'शिवभोजन नाव बदलून अटीभोजन करा' नीलेश राणे यांचा शिवसेनेला टोला
निलेश राणे (फोटो सौजन्य-ट्वीटर)

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील (Maha Vikas Aghadi) प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेने (Shiv Sena) आपल्या वचननाम्यात 10 रुपयात भोजन देण्याचे वचन राज्यातील जनतेला दिले होते. राज्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर 10 रुपयांत पोटभर जेवण ही योजना सुरु करणार हे अपेक्षित होते. त्यानुसार, राज्य मंत्रिमंडळाने या योजनेला मंजुरी दिली आहे. मात्र, महाराष्ट्र सरकारने शिवभोजनाला अटी आणि शर्ती लावल्या माजी खासदार नीलेश राणे यांनी शिवसेनेवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. शिवभोजन योजनेच्या अटी बघूनच भूक मरेल, शिवभोजनाचे नाव बदलून अटीभोजन असे करा, अशी घणाघाती टीका नीलेश राणे यांनी शिवसेनेवर केली आहे.

महाराष्ट्रात शिवसेनेचे सरकार आल्यानंतर राज्यातील गोर गरिबांना केवळ 10 रुपयांत जेवण मिळणार, असे अश्वासन शिवसेने आपल्या वचननाम्यात दिले होते. त्यानुसार राज्य मंत्रिमंडळाने या योजनेला मंजुरी दिली आहे. परंतु, महाराष्ट्र सरकारने शिवभोजन या योजनेत अटींचा समावेश करुनला अटी लावून सामान्य जनतेसमोर नवा प्रश्न निर्माण केला आहे. यावपु विरोधीपक्षातील नेते नीलेश राणे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. "शिवभोजन योजनेतील अटी बघूनच माणसाची भूक मरेल. शिवभोजन नाव बदलून अटीभोजन करा. सरळ हाताने काही मिळेल अशी अपेक्षा या सरकारकडून कुणी करू नये" असे संतापजनक विधान त्यांनी केले आहे. हे देखील वाचा- मी पक्षादेश पाळतो, दिवाकर रावते यांच्याकडून नाराज असल्याच्या चर्चांना पूर्णविराम

नीलेश राणे यांचे ट्विट-

अशा आहेत शिवभोजन थाळीसाठी अटी

1) जेवण दुपारी 12 ते 2 याचा कालावधीत उपलब्ध असेल.

2) प्रायोगिक तत्वावर सुरुवातीला जास्तीत जास्त 150 जणांनाच जेवण मिळेल

3) जेवणात 30 ग्रॅमच्या दोन चपात्या, 100 ग्रॅम भाजी, 100 ग्रॅम वरण व दीडशे ग्रॅम भात मिळेल.

4) शिवभोजनालय चालवण्यासाठी संबंधिताकडे स्वत:ची पुरेशी जागा असावी.

5) भोजनालयातील जेवण बाहेर घेऊन जाण्यास मनाई असेल

6) एका भोजनालयात किमान 75 ते कमाल 150 थाळी भोजन उपलब्ध होईल.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांकडून सत्तेधाऱ्यांवर टिका करण्याची एकही संधी नाहीत. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याअगोदरही भाजपच्या काही नेत्यांनी महाविकासआघाडी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.