Sanjay Ghodawat | (File Photo)

प्रसिद्ध उद्योज संजय घोडावत (Sanjay Ghodawat) यांना पाच कोटी रुपयांची खंडणी (Kolhapur Extortion) मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात कोल्हापूर (Kolhapur) येथून एकास अटक करण्यात आली आहे. पाच कोटी रुपयांची खंडणी दिली नाही तर संजय घोडावत आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्यात येईल अशी धमकी देण्यात आली होती. या धमकी नंतर प्राप्त झालेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला. तसेच, तपास करत हातकणंगले येथून एका अटक करण्यात आली.

उद्योगपती संजय घोडावत (वय वर्षे 56) हे कोल्हापूर जिल्ह्यातील जयसींगपूर येथे राहतात. तेथे त्यांचे निवासस्थानही आहे. दरम्यान, 13 ते 18 जून या कालावधीमध्ये घोडावत यांना फोन, व्हॉट्सअॅप, एसएमएस तसेच व्हॉस्ट्सअॅपच्या माध्यमातून कॉल करुन आरोपींनी पाच कोटी रुपयांची धमकी मागितली. तसेच, पोलिसांना कळवले किंवा खंडणी दिली नाही तर तुमच्यासह (संजय घोडावत) कुटुंबीयांनाही ठार मारण्याची आरोपींनी धमकी दिली. (हेही वाचा, Pune: CA कडून 1 लाखांची मागणी करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल; पहा काय आहे संपूर्ण प्रकरण)

दरम्यान, आरोपींनी केवळ संजय घोडावतच नव्हे तर घोडावत यांचा व्यावसायिक भागिदार निलेश बागी (रा. बेळगाव) यांनाही धमकी दिली. पोलिसांकडे प्राप्त तक्रारीत तसा उल्लेख आहे. पोलिसांकडील तक्रारीनुसार आरोपींनी घोडावत आणि त्यांच्या व्यावसायिक भागिदारास धमकी देत पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली.

प्राप्त तक्रारीवरुन पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. तसेच, हातकणंगले येथून एका आरोपीस अटक केली. आणखी एक आरोपी दिल्लीचा असून तो फरार झाल्याचे वृत्त आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रमेशकुमार प्रजापती ठक्कर असे आहे. त्याचा आणखी एक साथीदार व्ही पी सिंग पसार झाला आहे. तो दिल्लीचा रहीवासी असल्याचे समजते. पोलिसांनी आरोपींकडून एक लाख रुपये रोख, 15 हजार रुपये किंमतीचा मोबाईल आणि एक डायरी जप्त केली आहे.