Ambabai Temple (Photo Credits: Wiki Commons)

नवरात्री (Navratri) अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना सर्व भाविक देवीच्या स्वागतासाठी तयारीला लागले असतील. तर काही भाविक महाराष्ट्रातील जागरुक देवींच्या मंदिरात दर्शनासाठी जातील. यात कोल्हापूरची (Kolhapur) अंबाबाई (Ambabai Temple) हे सर्व भक्तांचे जागरुक असे श्रद्धास्थान आहे. नवरात्रीच्या दिवसात या देवीच्या दर्शनासाठी लाखो मैल दूरुन अनेक भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात.म्हणूनच नवरात्री निमित्त या मंदिर समितीचे लोक मंदिराच्या साफसफाईला लागले आहे. त्यासाठी येत्या 25सप्टेंबरला अंबाबाईचे मुख्य गाभारा बंद राहणार असून भाविकांना या दिवशी देवीचे दर्शन घेता येणार नाही.

नवरात्रीच्या दिवसांत कोल्हापूरच्या अंबाबाईचा एक वेगळा साज पाहायला मिळतो. तिचे ते मोहक रुप पाहण्यासाठी लाखो भक्त देवीच्या दर्शनासाठी येतात. या दिवसांत या मंदिराचा परिसर हा दिव्यांनी उजळून गेलेला असतो. नवरात्री निमित्त दरवर्षी प्रमाणे यंदाही या मंदिरासाठी विशेष तयारी करण्यात येणार आहे. त्यासाठी साफसफाईचे आणि मंदिर परिसराचे डागडुजीचेही काम जोरात सुरु झाले आहे. हेही वाचा- कोल्हापूर: महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबा मंदिरातील सोन्या- चांदीचे मूल्यांकन पूर्ण; अंबाबाईच्या सोन्यात वर्षभरात वाढ तर चांदी घटली

त्याचाच एक भाग म्हणून मंदिराचा मुख्य गाभारा स्वच्छ करण्यासाठी येत्या 25 सप्टेंबरला बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना या दिवशी अंबाबाईचे दर्शन घेता येणार नाही. नवरात्री निमित्त येणा-या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ आणि मनोभावे देवीच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांना देवीचे साग्रसंगीत दर्शन व्हावे यासाठी या मंदिर समितीने हा निर्णय घेतला आहे. तसेच या दिवशी मुख्य मूर्तीचे दर्शन बंद ठेवण्यात आले असले तरीही उत्सव मूर्तीचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे.