
विवाहबाह्य संबंधाला (Extramarital Affair) चटावलेल्या एका महिलेला प्रियकराच्या (Boyfriend) मदतीने पतीची हत्या करणे चांगलेच अंगाशी आले. ज्यामुळे तिला जन्माची अद्दल घडली. पतीची हत्या केल्याप्रकरणी कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील शाहूवाडी (Shahuwadi) तालुक्यातील महिला (Girlfriend) आणि तिच्या प्रियाकरासह आठ जणांना जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा (Life Imprisonment) ठोठावण्यात आली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी (24 जानेवारी) रोजी हा निकाल दिला.
सरकारी वकील समिउल्ला मोहम्मदसाक पाटील यांनी या खटल्याबद्दल माहिती देताना सांगितले की, नितीन बाबासाहेब पडवळे आणि पत्नी लिना (30) यांचा विवाह झाला होता. दरम्यान, लीना हिचे आरोपी रविशंकर माने याच्यासोबत विवाहबाह्य संबंध होते. या संबंधांना पती नितीन बाबासाहेब पडवळे (मयत) यांचा विरोध होता. आपल्या प्रेमात अडथळा निर्माण होत असल्याच्या कारणामुळे लीना हिने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करण्याचा कट रचला.
पतीला ठार मारण्याचा कट पूर्णत्वास नेण्यासाठी लीना हिने प्रियकर रवी यालाच सुपारी दिली. लिना हिच्याकडून हिरवा कंदील मिळताच रवी याने याने प्रेयसी लीना हिच्यासह आणखी आठ जणांना आपल्या कटात सहभागी करुन घेतले. या दहा जणांनी मिळून नितीन पडवळे याला विशाळगड किल्याजवळील वाघझाला जंगलात नेले आणि तिथे त्याची निर्घृण हत्या केली. त्याचे शिर धडावेगळे केले. धड दरी फेकून दिले. तर मोटारसायकल आणि मोबाईल, कपडे असे इतर साहित्य वारणा नदीपात्रात फेकून दिले. (हेही वाचा, कोल्हापूर बालहत्याकांड प्रकरण: गावित बहिणींची फाशीची शिक्षा टळली मरेपर्यंत जन्मठेप - मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय)
अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस एस तांबे यांच्यासमोर एकूण 21 साक्षीदारांची साक्ष, उलटतपासणी झाल्यावर 11 पैकी आठ आरोपींना भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 201, 164, 120 (बी), 392 आणि 34 अंतर्गत दोषी ठरवले आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
दरम्यान, सुनावणीदरम्यान एका आरोपीचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे फरार झाले आहेत. जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आठ आरोपींमध्ये रवी रमेश माने (27), किशोर दोड्डापा माने (21), आकाश उर्फ अक्षय सितारामण वाघमारे (19), दिलीप दुधाळे (29), मनेश कुकोरवी (31), लीना नितीन पडावळे, गितांजली मेंशी (30) यांचा समावेश आहे. हे सर्वजण कोल्हापूर शहरातील आहेत. तर, विजय रघुनाथ शिंदे (29, पालघर जिल्ह्यातील नालासोपारा) तर, अमित चंद्रशेखर शिंदे (मृत), सतीश वडर आणि इंद्रजीत बनसोडी (दोघेही फरार) आहेत.