Kokan Weather Prediction, July 12 : भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) 15 जुलैपर्यंत कोकण किनापट्टीवर जोरदार वाऱ्यासह मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाज नुसार कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रासह पश्चिम घाटात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याने पुढचे 3 दिवस कोकणात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. व नगरिकांंना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.आजपासून पुढील काही दिवस कोकणात जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळेल.कोकणात सुद्धा गेल्या काही दिवसात मुसळधार पाऊस आपली हजेरी लावत आहे. ज्यामुळे कोकणात काही भागांमध्ये पुरपरिस्थिति निर्माण झाली होती. अशामध्ये कोकणात आता पुढचे दोन दिवस महत्वाचे आहेत. हवामान खात्याने कोकणात अती मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आता कोकणचे उद्याचे हवामान कसे असतील ह्यासाठी हवामान विभागने कोकणातील उद्याचे हवामान ह्याच अंदाज लावला आहे.

कोकणातील उद्याचे हवामान कसे? 

पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय, कोकण आणि गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात प्रदेश आणि उत्तर अंतर्गत आणि किनारी कर्नाटकात काही ठिकाणी मुसळधार पावसाची अपेक्षा आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.