Gold-Silver Price: खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदी दरात घसरण; जाणून घ्या आजची किंमत
Gold | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Gold-Silver Price:  सोने-चांदी दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार होत असल्याचे चित्र आहे. पण आज बुधवारी मात्र सोन्याच्या दरात किंचित घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. तर चांदीच्या दरातही घसरण झाली. प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत आज (बुधवार, 26 जून) 71,600 रुपये असून, मागील ट्रेंडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत  71,800 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाली होती. सोन्याच्या दरांबरोबरच चांदीच्या दरातही घट होत आहे. मौल्यवान धातु 86,937च्या तुलनेत 87,032 रुपयांवर व्यवहार करत होते. मात्र, सकाळी 10 वाजण्याच्या आसपास यात 121 रुपयांची घट झाल्याचे पाहायला मिळाले. आता चांदी 86,770 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.हेही वाचा: Gold & Silver Rate Today: जाणून घ्या आजचा सोने व चांदी चे दर किती आहे?

चल पाहूया ग्राम प्रमाणे दोनयची किमत:

ग्रॅम सोनं किंमत

10 ग्रॅम 22 कॅरेट 66, 000 रुपये

10 ग्रॅम 24 कॅरेट 72, 000 रुपये

10 ग्रॅम 18 कॅरेट 54, 000 रुपये

ग्रॅम सोनं किंमत

1 ग्रॅम 22 कॅरेट 6,600 रुपये

1 ग्रॅम 24 कॅरेट 7,200 रुपये

1 ग्रॅम 18 कॅरेट 5,400 रुपये