Jewellery (Photo Credits: Pixabay)

आठवड्याच्या शेवटच्या टप्यात सोने आणि चांदीच्या दराने  ग्राहकांंना दिलासा दिला आहे. गेल्या 2 आठवड्या पासून सोन्या चांदी च्या दरात चढउतार दिसून येत होता.  मागच्या दोन महिन्यात सोने चांदी च्या किमतींनी अनेक रेकॉर्ड मोडले होते. पण आता जून महिन्यात किमती काहीशा खाली उतरल्या आहेत . आज आठवड्याच्या शेवटी सोनं व चांदी चा दर ऐकून ग्राहकांंना थोडा  दिलासा मिळाला आहे.

या आठवड्यात सोन्याच्या दर मध्ये 270 रुपयांची घसरण झाली. 11 जूनला 170 रुपये, 12 जूनला 320 रुपयांनी सोन्याचे दर वाढला होता. मात्र 14 जून रोजी 270 रुपयांनी किंमत खाली उतरली.

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), आता22 कॅरेट सोने 66,050 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,040 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

तर, या आठवड्यामध्ये चांदी 1000 रुपयांनी वढली. तर, 1800 रुपयांनी स्वस्त झाली. 13 जून रोजी भाव 600 रुपयांनी उतरले. 14 जून रोजी 200 रुपयांनी भाव उतरले. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 90,500 रुपये आहे.

कॅरेटचा भाव काय?

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 71,866 रुपये, 23 कॅरेट 71,578 रुपये, 22 कॅरेट सोने 65,829 रुपये झाले. 18 कॅरेट 53,900 रुपये, 14 कॅरेट सोने 42,042 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले आहे.