Kamlesh Sutar | Twitter

आज (18 जुलै) सकाळपासूनच सोशल मीडीयामध्ये किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओ बाबत चर्चा सुरू आहे. त्याचे पडसाद विधिमंडळामध्येही उमटले आहेत. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात सखोल चौकशी होणार असल्याची माहिती विधान परिषदेमध्ये दिली आहे. सोबतच डिजिटल मीडिया वेब मीडिया असोसिएशनच्या वतीने राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Home Minister Devendra Fadnavis) यांना वरिष्ठ पत्रकारांच्या शिष्टमंडळाने व वेब मीडिया असोसिएशनच्या पदाधिकारी यांनी कमलेश सुतार (Kamlesh Sutar) वरिष्ठ पत्रकार, मुख्य संपादक लोकशाही न्यूज चॅनेल यांना वाय प्लस (Y +) दर्जाची पोलीस सुरक्षा प्रदान करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.

काल लोकशाही वृत्तवाहिनीवर भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याबाबत आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केल्यामुळे राजकीय पक्षातील काही समाजविघातक यांच्याकडून कमलेश सुतार यांना धोका निर्माण झालेला आहे. पत्रकारांच्या वतीने गृहमंत्री व पोलीस महासंचालक यांना ई-मेलद्वारेही निवेदन पाठविण्यात आलेले आहे. वेब मीडिया असोसिएशन चे अध्यक्ष अनिल महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकशाही वृत्तवाहिनीचे संपादक श्री कमलेश सुतार यांना वाय प्लस (Y+) दर्जाची पोलीस सुरक्षा देण्याची मागणी वेब मीडिया असोसिएशन तर्फे राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.

Y+ सुरक्षेअंतर्गत, चार सुरक्षा कर्मचारी सुरक्षा वाहनासह दोन शिफ्टमध्ये काम करत असतात.