खोपोली: धावपटू स्नेहा सिंग हिच्यासोबत 'विठ्ठल हॉटेल' मधील कर्मचाऱ्यांचा गैरव्यवहार; 3 जणांविरोधात गुन्हा दाखल
Maharashtra Police | Image Used for representational purpose only | (Photo Credits: Facebook)

धावपटू स्नेहा सिंग (Sprinter Sneha Singh) हिने हॉटेलमधील तीन कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रायगड (Raigad) जिल्ह्यातील खोपोली (Khopoli) परिसरात 'विठ्ठल' (Vitthal) नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलमधील तीन कर्मचाऱ्यांच्या गैरव्यवहाराप्रकरणी स्नेहा हिने गुन्हा दाखल केला आहे. 16 एप्रिल रोजी सहकारी प्रल्हाद सिंग आणि समीर सिंग यांच्या सोबत असताना हा सर्व प्रकार घड्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.

प्रल्हाद सिंग, समीर सिंग आणि स्नेहा सिंग हे तिघेही खोपोलीच्या विठ्ठल हॉटेलमध्ये रात्रीच्या जेवणासाठी गेले होते. त्यादरम्यान त्यांच्यात आणि हॉटेल स्टाफमध्ये काहीतरी किरकोळ वाद झाला. त्यानंतर त्यांना अधिक बिल आकारण्यात आले. या सर्व प्रकारानंतर स्नेहा सिंग हिने खोपोली पोलिस स्टेशनात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 323, 504 आणि 34 अंतर्गत एफआयआर दाखल दाखल करुन घेतली आहे. तसेच, गुन्हेगारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) अंतर्गत कलम 107 आणि 116 (3) अंतर्गत आरोपींविरूद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे.

स्नेहा सिंग ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची समर्थक असून तिने 'रन फॉर नमो अगेन' अभियानात सहभाग घेतला होता. लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांना मदत मिळवण्यासाठी 50 देशांमध्ये या मोहिमेची सुरूवात करण्यात आली होती.