राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे (Actress Ketaki Chitale) हिला अटक करण्यात आली होती. काल केतकी चितळे हिने मुंबई उच्च न्यायालयात आपली अटक बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. त्याचवेळी, अभिनेत्रीच्या अटकेवर, राष्ट्रीय महिला आयोगाने महाराष्ट्राच्या डीजीपीला नोटीस बजावली असून, मानहानीच्या तरतुदींची अंमलबजावणी करण्याबाबत आणि प्रत्यक्ष हजर राहण्याबद्दल सात दिवसांत स्पष्टीकरण मागितले होते, त्यावर डीजीपींनी उत्तर पाठवले आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा (Rekha Sharma) यांनी सांगितले की, ‘समन्स पाठवल्यानंतर महाराष्ट्राच्या डीजीपींनी त्यांना कृती अहवाल पाठवला ज्यात केतकीच्या अटकेसह अनेक विसंगती आहेत. प्रकरण अदखलपात्र असूनही दंडाधिकार्यांच्या पूर्व परवानगीशिवाय ते दाखल करण्यात आले होते.’
On being summoned Maharashtra DGP sent us Action Taken Report which has several discrepancies including her arrest which was made without prior permission of the magistrate despite the case being non-cognizable: NCW chief Rekha Sharma on the arrest of Marathi actor Ketaki Chitale https://t.co/h3KAgmMq9v
— ANI (@ANI) June 17, 2022
The case is in the court now, but it's a political vendetta entirely: NCW chief Rekha Sharma on case against Marathi actress Ketaki Chitale who was arrested on May 15 for allegedly sharing a derogatory post on Facebook against NCP chief Sharad Pawar. pic.twitter.com/w7w5tLEy5y
— ANI (@ANI) June 17, 2022
त्या पुढे म्हणाल्या, ‘अभिनेत्रीवर शारीरिक अत्याचार करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई केली नाही. बदनामीची तक्रार वैयक्तिकरित्या शरद पवार यांच्याकडून आली नव्हती, ती त्यांच्या पक्षाकडून करण्यात आली होती. जोपर्यंत संबंधित व्यक्तीकडून तक्रार येत नाही तोपर्यंत ती दखलपात्र नसते त्यामुळे कोणत्या कारणास्तव केतकीला अटक करण्यात आली?. हे प्रकरण आता न्यायालयात आहे, पण आता तो पूर्णपणे राजकीय सूड आहे.’ (हेही वाचा: महिलेसोबत व्हिडिओ कॉलवर अश्लील कृत्य करणे व्यक्तीला पडले महागात, सायबर फसवणूकदारांनी लावला 2.06 लाखांचा चुना)
दरम्यान, टीव्ही अभिनेत्री केतकी चितळे हिने मराठीत इतर कोणी लिहिलेली एक पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर शेअर केली होती. या पोस्टमध्ये फक्त पवार आडनाव आणि वय 80 असा उल्लेख आहे. यानंतर महाराष्ट्रातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने ही पोस्ट आक्षेपार्ह समजून, केतकीच्या विरोधात तक्रार दाखल केली गेली. ठाणे पोलिसांनी 15 मे रोजी केतकी चितळेला अटक केली होती.