KDMC | (File Image)

कल्याण डोंबिवली महानगरपालिका नोकरभरती 2021 करण्यात येत  आहे. केडीएमसी मध्ये एकूण 120 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ही भरती विविध पदांसाठी असणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करु शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी पद, पदांची संख्या, पात्रता, भरती प्रक्रिया आणि इतर तपशील खाली देत आहोत. ही भरती थेट मुलाखतीद्वारे केली जाणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी 30 एप्रिल 2021 या दिवशी सकाळी 11 वाजता मुलाखती घेतल्या जाणार आहेत. याबाबतचा तपशील खाली दिला आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या (कंसात)

वैद्यकीय अधिकारी (जनरल( (34), आयुष वैद्यकीय अधिकारी (), सिस्टर इनचार्ज (1), ECG टेक्निशियन (08), स्टाफ नर्स (59), सहाय्यक कपरिचारीका प्रसाविका (16), लॅब टेक्निशियन (02)

पद आणि पदासाठी शैक्षणिक पात्रता (कंसात)

वैद्यकीय अधिकारी (जनरल) (MBBS), आयुष वैद्यकीय अधिकारी (BAMS, BHMS,BUMS), सिस्टर इनचार्ज (12 वी (विज्ञान) उत्तीर्ण, जीएनएम, 7 वर्षांचा अनुभव), ECG टेक्निशियन (1 वर्षाचा अनुभव, इसीजी टेक्निशियन) , स्टाफ नर्स (बी.एससी (नर्सिंग) किंवा जीएनएम), सहाय्यक कपरिचारीका प्रसाविका (ANM), लॅब टेक्निशियन (BSC, DMLT) (हेही वाचा, India Post GDS Recruitment 2021: पोस्टल विभागात 1421 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती; उमेदवार 21 एप्रिलपर्यंत करू शकतात अर्ज)

इतर पात्रता आणि तपशील

वरील सर्व पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वयाची कोणतीही अट नाही. तसेच, त्यांच्याकडून अर्जाचे कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. नोकरीचे ठिकाण हे कल्याण डोंबिवली असेन. तसेच, वरील पदांसाठी थेट मुलाखत घेतली जाईल. मुलाखत प्रक्रिया 30 एप्रिल 2021 रोजी सकाळी 11 वाजता सुरु होईल.

मुलाखतीचे ठिकाण: आयुक्त कार्यालय, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, शंकरराव चौक. कल्याण (पश्चिम). अधिक तपशिलासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेचे अधिकृत संकेतस्थळ पाहा.