कल्याण डोंबिवली महानगरीपालिका निवडणूक (KDMC Election 2020) अद्याप जाहीर झाली नाही. परंतू, निवडणुकीचे पडघम मात्र वाजायला सरुवात झाली आहे. या वेळी केडीएमसी निवडणुकीत आजदे, सागाव, नांदिवली, पंचानंद, धारिवली, संदप, उसरघर, काटई, भोपर, देसलेपाडा नऊ गावांचा समावेश असणार आहे. केडीएमसीमधील 27 गावांपैकी 18 गावे वगळून त्यांची कल्याण उपनगर परिषद स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला होता. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे उर्वरीत 9 गावांच्या समावेशासह केडीएमसी निवडणूक पार पडणार हे आता स्पष्ट झाले आहे.
निवडणूक आयोगाने निवडणुकीची पूर्वतयारी करण्याचे आदेशही संबंधित विभागांना दिले आहेत. त्यानुसार संबंधित विभाग कामालाही लागला आहे. दरम्यान, केडीएमसी निवडणुकीत नव्याने समाविष्ठ होणाऱ्या नऊ गावांमुळे प्रभागरचनाही बदलली जाणार आहे. त्यामुळे नवी प्रभाग रचना, आरक्ष सोडत आणि निवडणुकीची तारीख यांसह एकूणच निवडणूक कार्यक्रम कधी जाहीर होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्य सरकारने सध्यातरी नऊ गावांसह केडीएमसीची सुधारित हद्दरचना अधिसूचना राज्य सरकारने जारी केली आहे. (हेही वाचा, KDMC Elections 2020: कल्याण-डोंबिवली महानगपालिका निवडणुकीची प्राथमिक कामे सुरु करावीत, राज्य निवडणूक आयोगाची सूचना)
दरम्यान, कोडीएमसीमध्ये समाविष्ठ करण्यात आलेल्या 27 गावांपैकी 18 गावे बगळण्यासंदर्भात आणि उर्वरीत नऊ गावे महापालिका हद्दीत ठेवण्यासंदर्भातली घोषणा विधिमंडळ अधिवेशनात राज्य सरकारने 14 मार्च या दिवशी केली होती. त्याबाबतची उधिसूचना 24 जून रोजी काढण्यात आली होती. या अधिसूचनेत केडीएमसी हद्दीतून वगळलेल्या 18 गावांची कल्याण उपनगर परिषद असेल, असे म्हटले होते.