Kartiki Wari 2019:  पंढरपूर - मिरज दरम्यान कार्तिकी वारी साठी रेल्वे प्रशासनाकडून 2 नव्या स्पेशल ट्रेन्स
Railway | Image used for representational purpose | (Photo Credits: Facebook)

कार्तिकी वारीसाठी (Kartiki Wari) पंढरपूरला जाणार्‍या भाविकांना रेल्वे प्रशासनाने दोन अनारक्षित स्पेशल ट्रेन्स उपलब्ध करून दिल्या आहेत.या स्पेशल ट्रेन्स मिरज आणि पंढरपूर दरम्यान धावणार आहेत. दरम्यान कार्तिकी एकादशीच्या (Kartiki Ekadashi) निमित्त वारकर्‍यांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी तसेच त्यांची गैरसोय टाळण्यसाठी आता या दोन नव्या रेल्वे ट्रेन्स फायदेशीर ठरणार आहेत. Kartiki Ekadashi Special ST Bus: कार्तिकी एकादशी निमित्त आजपासून 1300 जादा एसटी बसची सुविधा; मुंबई, ठाणे रायगड सह 'या' ठिकाणहून प्रवाशांना घेता येणार लाभ.

12 नोव्हेंबर दिवशी ट्रेन क्रमांक 01427 ही ट्रेन पंढरपूर वरून मिरजकडे तर 01428 ही ट्रेन मिरजकडून पंढरकडे धावणार आहे. या पंढरपूर- मिरज ट्रेनला सांगोला, जाथरोड,ढळगाव, कवठेमहंकाळ, सलागरे आणि अरग या स्थानकावर थांबणार आहे. या स्पेशल ट्रेन्स 12 डब्ब्यांच्या असून सेकंड क्लास डब्ब्यांच्या असतील. या ट्रेनसाठी आरक्षणाची गरज नाही.

यंदा कार्तिकी एकादशी 8 नोव्हेंबरला साजरी झाली. देव उठनी एकादशी किंवा प्रबोधनी एकादशी म्हणून ही एकादशी ओळखली जाते. चातुर्मासामध्ये निद्रिस्ट अवस्थेमध्ये असलेले देव कार्तिकी एकादशीला जागे होतात आणि नव्या, शुभ पर्वाची सुरूवात होते. असे समजले जाते. त्यामुळे कार्तिकी एकादशीला मोठ्या प्रमाणात विठू भक्त पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी हजर होतात.