Photo Credit- X

Ganesh Visarjan: कर्नाटकातील तुमाकुरू येथे गणपती विसर्जनाला गालबोट लागल्याची घटना घडली. गणपती विसर्जनावेळी पाण्यात पडून दोन मुलांसह वडिलांचा मृत्यू झाला (Father Sons Drown in Karnataka)आहे. देशभरात अनेक ठिकाणी मोठ्या धुमधडाक्यात रविवारी अकरा दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. स्थानिकांनी त्यांच्या वापरासाठी 20 फूट खोल तलाव खोदला होता. तेथेच गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येत होते. तेथे ही दुर्घटना घडली. (हेही वाचा:Kadapa Shocker: गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू, आंध्रप्रदेशातील घटना (Watch Video) )

20 फूट खोल तलावात गणेश मूर्तीच्या विसर्जनावेळी तोल गेल्याने दोन मुले पाण्यात घसरून पडली. त्यांना वाचवण्यासाठी मुलांच्या वडिलांनी पाण्यात उडी घेतली.अनेक गणेश मूर्तींचे तेथे विसर्जन झाल्याने तलावातील पाणी गडूळ, रासायनिक झाले होते. त्यामुळे तिघांनाही ते बाधिक ठरले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेवेळी घटनास्थळी कुटुंबातील किमान 15 ते 20 सदस्य उपस्थित होते. त्यांनी ही सर्व घटना पोलिसांना सांगितली. (हेही वाचा:Ganesh Idol Immersion: गुजरातमध्ये गणेश विसर्जनाला गालबोट; गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी सरस्वती नदीत बुडून एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू)

दरम्यान, गुजरातमध्येही अशीच घटना समोर आली. गणेश मूर्तीच्या विसर्जन सोहळ्यादरम्यान, गांधीनगर भागात तब्बल १४ जणांचा मृ्त्यू झाला होता. दरवर्षी मृत्यूंचा अशा घटना समोर येत असतात. त्यासाठी नागरिकांनी गणपती विसर्जन सोहळ्यादरम्यान सतर्क राहणे गरजेचे आहे.