Kangana Ranaut, CM Uddhav Thackeray (PC - Facebook)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज राज्यातील जनतेला संबोधित केले. दरम्यान, मुंबईसाठी मोठा निर्णय सांगून मी लाईव्हची सुरूवात करतो, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी आरेतील मेट्रो कारशेड (Aarey Metro Carshed) कांजूरमार्ग येथे करण्यात येणार आहे, अशी घोषणा केली. त्यांच्या या घोषणेवर भाजपच्या अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यातच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हीने आणखी एक ट्विट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच आरे कारशेड सर्व मुंबईकरांची समस्या नाही, अशा शब्दात कंगनाने महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे.

कंगना विरुद्ध शिवसेना हा वाद गेल्या अनेक दिवसांपासून पाहायला मिळत आहे. कंगनाने ट्विटरच्या माध्यमातून वारंवार उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षावर टीका करताना दिसली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आज आरे कारशेड संदर्भात केलेल्या घोषणेवर कंगनाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. कंगना म्हणाली की, “काही फॅन्सी कार्यकर्त्यांची समस्या ही सर्व मुंबईकरांची समस्या असू शकत नाही. मी देखील गेल्या वर्षाभरात 1 लाखांहून अधिक झाडे लावली आहेत. झाड तोडणे अयोग्यच आहे. परंतु, काही निवडक श्रीमंत लोकांसाठी शहराचा विकास थांबवणे हे देखील योग्य नाही." हे देखील वाचा-Thalaivi: कंगना रनौत चा आगामी चित्रपट थलाइवी च्या सेटवरील जयललिताचा लूक सोशल मीडियावर व्हायरल

कंगना रनौतचे ट्विट-

शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांची पत्रकार आशुतोष यांनी नुकतीच मुलाखत घेतली होती. या मुलाखातीत आशुतोष आणि संजय राऊत यांनी अनेक राजकीय मुद्द्यावर चर्चा केली. दरम्यान, आशुतोष यांनी कंगनाचे नाव घेत गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री आणि शिवसेनेवर होत असलेल्या टीकेबद्दल प्रश्न उपस्थित केला. यावर संजय राऊत संजय राऊत म्हणाले की, शिवसेना कुमकुमत झालेली नाही. माझ्यावर 140 पेक्षा अधिक खटले सुरु आहेत. आम्ही घाबरणारे लोक नाहीत आणि यापुढेही घाबरणार नाही. सत्ता येते आणि जाते. सत्ता घेऊन कुणीही येत नाही. सगळ्यांना जावे लागणार आहे. मात्र, जे आमच्यावर भुकंत आहेत, त्यांनाही माहिती आहे. भीती तर त्यांच्या मनात आहे. ते फक्त वरून दाखवत आहेत. पण, जेव्हा वेळ येईल, तेव्हा नक्की सांगू. आम्ही अपमान विसरणार नाही. हा महाराष्ट्र आहे,” असे उत्तर देत राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्यांना त्यांनी इशारा दिला होता.